राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रणॉयचा श्रीकांतवर विजय

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत जगात दुसऱ्या स्थानावर असलेला किदाम्बी श्रीकांत आणि प्रसिद्ध एच.एस. प्रणॉय यांच्यात पुरुष एकेरीचा अंतिम सामना झाला. ज्यामध्ये प्रणयने बाजी मारली आहे.

Updated: Nov 8, 2017, 04:46 PM IST
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रणॉयचा श्रीकांतवर विजय title=

नवी दिल्ली : राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत जगात दुसऱ्या स्थानावर असलेला किदाम्बी श्रीकांत आणि प्रसिद्ध एच.एस. प्रणॉय यांच्यात पुरुष एकेरीचा अंतिम सामना झाला. ज्यामध्ये प्रणयने बाजी मारली आहे.

प्रणॉयने 21-14, 21-17 ने शुभांकर याला पराजित केलं तर श्रीकांतने 21-16 21-18 ने सेनवर विजय मिळवला होता आणि दोन्ही फायनलमध्ये आले होते. श्रीकांत आणि प्रणॉय यांची एका आठवड्यापूर्वी फ्रेंच ओपन सुपर सिरीजमधील उपांत्य फेरीत लढत झाली होती. जिथे श्रीकांतने बाजी मारली होती.

सोळा वर्षीय लक्ष्य सेनने श्रीकांत विरोधात उत्साहपूर्ण खेळ दाखवला होता. पण त्याचे शॉट जास्त अचूक आणि गतीशील नव्हते. त्यामुळे श्रीकांतला हरवणं त्याला शक्य झालं नव्हतं.