Rohit Sharma: मला माझ्यावरच संशय येऊ लागला की...; अखेर रोहित शर्माच्या मनातील खदखद बाहेर

Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने म्हटलंय की, आपल्या 17 वर्षांच्या क्रिकेट प्रवासात खूप काही पाहिल्यात. वाईट काळाने त्याला चांगलं बनून कसं बाहेर पडायचं हे शिकवलं. 

सुरभि जगदीश | Updated: May 16, 2024, 07:47 AM IST
Rohit Sharma: मला माझ्यावरच संशय येऊ लागला की...; अखेर रोहित शर्माच्या मनातील खदखद बाहेर title=

Rohit Sharma: आयपीएलनंतर आयसीसी टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. यासाठी आता अनेक देशाच्या खेळाडूंनी प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे. या टूर्नामेंटपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा एक इंटरव्ह्यू झाला आहे. यावेळी रोहित शर्माने मिडल ऑर्डर फलंदाजीपासून कर्णधारपदाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. यावेळी रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला ते पाहूया. 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने म्हटलंय की, आपल्या 17 वर्षांच्या क्रिकेट प्रवासात खूप काही पाहिल्यात. वाईट काळाने त्याला चांगलं बनून कसं बाहेर पडायचं हे शिकवलं. जेव्हा त्याचा वेळ चांगला नव्हता, तेव्हा तो स्वतःवर संशय येऊ लागला आणि अशा परिस्थितीत कोणीही त्याच्या मदतीला आलं नाही, अशी खंतही हिटमॅनने व्यक्त केली आहे. 

दुबई आय 103.8 शी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “माझ्या क्रिकेट प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर मला खेळायला सुरुवात करून 17 वर्षे झालीयेच. तुम्ही कोणताही खेळ खेळलात तरी आंतरराष्ट्रीय टीमपर्यंत मजल मारणं सोपं नसतं. मी ज्या ठिकाणी आणि देशातून आलो आहे, जिथे बरेच लोक क्रिकेट खेळतात. अशा ठिकाणाहून त्या 15 खेळाडूंमध्ये तुमचं नाव दिसलं की एक वेगळीच भावना मनात येते. सर्वप्रथम तुम्ही स्वतःला नशीबवान समजता, पण यामध्ये नशिबाचीही मोठी भूमिका असते."

17 वर्षांमध्ये अनेक चढ-उतार आले- रोहित 

रोहित शर्मा पुढे म्हणाला की, “माझ्या क्रिकेट प्रवासात बरेच चढ-उतार आले आहेत. मात्र मी म्हणेन की, मी या काळात उतार जास्त पाहिले आहेत. वाईट काळात मी जे पाहिलं, अनुभवलं त्याचा माझ्यावर बराच प्रभाव पडला आणि आजच्या घडीला मी हा असा तुमच्यासमोर आहे. जेव्हा तुम्ही अत्यंत वाईट काळातून पुढे जाता, त्यानंतर तुम्ही पूर्णपणे भिन्न व्यक्ती म्हणून समोर येता. जेव्हा मी माझ्या करिअरला सुरुवात केली तेव्हा फारशा सकारात्मक गोष्टी दिसल्या नाहीत. खरं तर, माझा टीमवरही सकारात्मक प्रभाव पडला नाही.”

माझी कोणीही मदत केली नाही

तो पुढे म्हणाला, “एक वेळ अशी होती जेव्हा मी स्वतःवर शंका घेऊ लागलो होतो. मी स्वतःलाच प्रश्न विचारत होतो की मी या जागेसाठी योग्य आहे का? माझ्यावर एक वेळ अशी आली की, कोणीही मदतीसाठी पुढे आलं नाही. मग मला एक व्यक्ती म्हणून काय करायचं आहे, हे शोधण्यासाठी वेळ मिळाला. मला नेमकं काय हवंय आणि मला खूप आवडत असलेल्या खेळातून मला काय हवं आहे? जर मी माझ्या क्रिकेट प्रवासाबद्दल बोललो तर ते आश्चर्यकारक आहे, असंही रोहित शर्माने म्हटलं आहे.