जमैका संघ हरला पण उसेन बोल्टने मने जिंकली

 वेगाचा बादशाह अशी ओळख असलेल्या उसेन बोल्टला आपल्या कारकिर्दीतली अखेरची शर्यत आज खेळत होता. म्हणून जगाच्या नजरा त्याच्याकडे खिळून राहिल्या होत्या. पण दुर्देवाने त्याच्या पायात कळ आली आमि त्याचे स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न अर्धवट राहिले. दुखरा पाय घेऊन उसैनने ३० कि.मीचे अंतर सहकाऱ्याच्या मदतीने पार करत स्पर्धा पार करण्याचा निर्धार पूर्ण केला. त्यामुळे जमैकाच्या संघाचा जरी पराभव झाला असला तरी उसन बोल्टने सर्वांची मने जिंकली.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 13, 2017, 03:37 PM IST
जमैका संघ हरला पण उसेन बोल्टने मने जिंकली title=

लंडन:  वेगाचा बादशाह अशी ओळख असलेल्या उसेन बोल्टला आपल्या कारकिर्दीतली अखेरची शर्यत आज खेळत होता. म्हणून जगाच्या नजरा त्याच्याकडे खिळून राहिल्या होत्या. पण दुर्देवाने त्याच्या पायात कळ आली आमि त्याचे स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न अर्धवट राहिले. दुखरा पाय घेऊन उसैनने ३० कि.मीचे अंतर सहकाऱ्याच्या मदतीने पार करत स्पर्धा पार करण्याचा निर्धार पूर्ण केला. त्यामुळे जमैकाच्या संघाचा जरी पराभव झाला असला तरी उसेन बोल्टने सर्वांची मने जिंकली.

येथे सुरू असलेल्या विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत ग्रेट ब्रिटनने सुवर्ण पदक पटकावले.  पराभव झालेल्या जमैका संघातल्या अन्य तीन जणांनी आपलं लॅप पू्र्ण केलं आणि बॅटन उसेनकडे दिलं. उसैन आपल्या नेहमीच्या अंदाजातच धावला.पण काही अंतरावरच त्याच्या पायाच्या स्नायूंमध्ये जबरदस्त कळ आली आणि तो कळवळून खाली कोसळला.न्यायला व्हीलचेअर आणण्यात आली पण त्यावर बसण्यास त्यानं नकार दिला. आपल्या संघातल्या खेळाडूंचा आधार घेत अडखळत का होईना पण त्याही अवस्थेत अखेरचा ३० मीटर्सचा ट्रॅक आपल्या संघातल्या खेळाडूंच्या आधारानं त्याने पूर्ण केला आणि आपल्या खेळाला अखेरचा सलाम केला. कारकिर्दीला सुवर्ण निरोप देण्याचा क्षण हुकल्याची हुरहुर त्याच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर होती. अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या कारकीर्दीतून निवृत्त होण्यापूर्वी सुवर्ण पटकावण्याचा निर्धार उसैन बोल्टने केला होता. मात्र, त्याला अपयश आले. 

उसेनची अशी कारकिर्द

उसेन बोल्टने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये सहा सुवर्ण तर विश्व चॅम्पियनशिपमध्ये अकरा विजेतेपदांची कमाई केली आहे. २०१२ च्या लंडन आणि २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने तीन-तीन सुवर्णपदके कमावली आहेत. ९.५८ सेकंदात १०० मीटर, तर १९.१९ सेकंदात २०० मीटर अंतर धावून पार करण्याचा विश्वविक्रमही उसैन बोल्टने २००९ च्या बर्लिनमधील स्पर्धेत नोंदवला. याचबरोबर २००८ च्या ऑलिम्पिकमधील चार बाय १०० मीटर रिले शर्यतीत त्याचा सहकारी नेस्ता कॅन्टर हा उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे जमैकाचे हे विजेतेपद काढून घेण्यात आले होते. 

पहिले कास्य पदकं

गेल्या आठवड्यात येथील विश्व अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीतील पुरुषांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत उसैन बोल्टला  करिअरमधील पहिले कास्य पदक मिळाले. या आधीच्या प्रत्येक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्ण कमाई केली आहे. यावेळी अमेरिकेच्या जस्टीन गॅट्लीनने सुवर्ण पदाकावर कब्जा केला.