दिल्ली प्रदूषण, मेडिकल संघटनेचा बीसीसीआयला सल्ला

भारतीय मेडिकल संघटनेनं बीसीसीआयला एका पत्राद्वारे मॅच खेळवण्यापूर्वी प्रदूषण पातळीही लक्षात घेण्याचा सल्ला दिला आहे. 

अर्चना हरमलकर | Updated: Dec 7, 2017, 02:44 PM IST
दिल्ली प्रदूषण, मेडिकल संघटनेचा बीसीसीआयला सल्ला

नवी दिल्ली : भारतीय मेडिकल संघटनेनं बीसीसीआयला एका पत्राद्वारे मॅच खेळवण्यापूर्वी प्रदूषण पातळीही लक्षात घेण्याचा सल्ला दिला आहे. 

फिरोजशाह कोटला मैदानावर खेळाडूंना झाला होता प्रदूषणाचा त्रास

नुकत्याच भारत आणि श्रीलंका दरम्यान दिल्लीतील फिरोजशाह कोटलावर झालेल्या टेस्टमध्ये दोन्ही टीम्सच्या खेळाडूंना प्रदूषणाचा त्रास झाला होता. 

बीसीसीआयला दिलाय हा सल्ला

या पार्श्वभूमीवर भारतीय मेडिकल संघटनेनं हा सल्ला बीसीसीआयला दिला आहे. मॅच घेण्यापूर्वी इतर बाबींप्रमाणेच प्रदूषणाची पातळी काय आहे याचादेखील समावेश नियमांमध्ये करावा असा सल्ला दिलाय. 

खेळामध्ये मिली सेकंद आणि मिली मीटरही खेळाडूंची हार-जीत ठरवत असते तिथे वायू प्रदूषणही खेळाडूंच्या कामगिरीवर महत्त्वाचा प्रभाव टाकू शकते. क्रिकेट मॅच खेळताना पाऊस आणि कमी प्रकाश या बाबींचा विचार केला जातो. याचबरोबर पर्यावरण प्रदूषणाचाही मॅच खेळवण्यापूर्वी विचार केला पाहिजे असा सल्ला या पत्राद्वारे भारतीय मेडिकल संघटनेनं बीसीसीआयला दिलाय.