अंडर १९ वर्ल्डकप : भारताचा ऑस्ट्रलियावर दणदणीत विजय

टीम इंडियाने अंडर-19 वर्ल्ड कप-2018 च्या पहिल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा 100 धावांना पराभव केला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 14, 2018, 02:18 PM IST
अंडर १९ वर्ल्डकप : भारताचा ऑस्ट्रलियावर दणदणीत विजय

ओव्हल : टीम इंडियाने अंडर-19 वर्ल्ड कप-2018 च्या पहिल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा 100 धावांना पराभव केला आहे.

राहुल द्रविडच्या कोचिंगमध्ये खेळणारी भारतीय टीमने आधी बॅटींग करत 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमवत 328 रन बनवले. ऑस्ट्रेलियाच्या टीमने 42.5 ओव्हमध्ये 228 रन केले पण त्यासाठी त्यांनी सगळ्या विकेट गमवल्या. ओपनर जॅक एडवर्ड्सने सर्वाधिक 73 रन केले. भारताकडून कमलेश नागरकोटी आणि शिवम मावीने 3-3 विकेट घेतले. तर अभिषेक शर्मा आणि अंकुल रॉय यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

भारताने धावांचा डोंगर उभारल्यानंतर त्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कंगारू टीमची सुरुवात धिम्या गतीने झाली. भारतीय टीमकडून कर्णधार पृथ्वी शॉ 94 ची खेळी केली. पृथ्वीचं शतक हुकलं पण त्याच्या 94 रनच्या जोरावर भारताने विजय मिळवला.

अंडर-19 वर्ल्डकपमध्ये आपला पहिला सामना खेळणाऱ्या पृथ्वी शॉने 100 बॉलमध्ये 8 फोर आणि 2 सिक्स लगावले. त्याच्या आणि मंजोतमध्ये पहिल्या विकेटसाठी रेकॉर्डब्रेक 180 रनची पार्टनरशिप झाली. या जोडीने रॉबिन उथप्पा आणि शिखर धवनचा 175 रन्सचा रेकॉर्ड मोडला.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close