बांग्लादेशचं लोटांगण, भारताला विजयासाठी एवढ्या रन्सची आवश्यकता

बांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये भारतीय बॉलर्सनी शानदार कामगिरी केली. 

Updated: Mar 8, 2018, 09:01 PM IST
बांग्लादेशचं लोटांगण, भारताला विजयासाठी एवढ्या रन्सची आवश्यकता

कोलंबो : बांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये भारतीय बॉलर्सनी शानदार कामगिरी केली. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय बॉलर्सनी बांग्लादेशला २० ओव्हर्समध्ये १३९ रन्सवर रोखलं. जयदेव उनाडकटनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या तर विजय शंकरला २ विकेट मिळाल्या. शार्दूल ठाकूर आणि युझवेंद्र चहलनं प्रत्येकी एक विकेट घेतली. बांग्लादेशच्या लिटोन दासनं सर्वाधिक ३४ रन्स केल्या तर सब्बीर रहमानला ३० रन्स करता आल्या.

श्रीलंकेविरुद्धची पहिली टी-20 हरल्यानंतर दुसरी टी-20 जिंकून ट्राय सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरली आहे. बांग्लादेशविरुद्धच्या मागच्या पाचही टी-20मध्ये भारताचा विजय झाला आहे. त्यामुळे हे रेकॉर्ड कायम ठेवण्याची संधी भारतापुढे आहे. 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा