कांगारूंचा 'रडीचा डाव' चव्हाट्यावर, विकेटकिपरने केलं असं काही...

 हा 'नो बॉल' म्हणून घोषित करून भारताला फ्री हिट देण्यात आली.

& Updated: Nov 22, 2018, 10:51 AM IST
कांगारूंचा 'रडीचा डाव' चव्हाट्यावर, विकेटकिपरने केलं असं काही... title=

ब्रिस्बेन : गाबावर झालेल्या भारत- ऑस्ट्रेलिया पहिल्या टी 20 सामन्यातऑस्ट्रेलियाने भारतावर 4 रन्सने मात करत तीन टी 20 मॅचच्या सिरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. सामन्या दरम्यान वादाचे प्रसंगही अनेकदा आले. यामध्येच ऑस्ट्रेलियन विकेटकिपर एलेक्स केरीची 'फेक स्टंपिंग' देखील जास्त चर्चेत आहे. या स्टंपिंगवरून सोशल मीडियात जास्त चर्चा होतेयं. कांगारूंच्या बेईमानी करण्याच्या प्रयत्नाला भारतीय फॅन्स ट्रोल करण्याची संधी सोडत नाहीएत. जाणून घेऊया त्यावेळी नक्की काय झालयं..

स्टंपिंगचा प्रयत्न पण...

विजयासाठी १७४ रनची आवश्यकता असताना भारताला १६९/७ एवढाच स्कोअर करता आला. पाऊस पडल्यामुळे ही मॅच १७ ओव्हरची करण्यात आली होती.

१७४ रनचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ओपनर रोहित शर्मा ७ रनवर आऊट झाला. पण शिखर धवननं ४२ बॉलमध्ये ७६ रनची खेळी केली.

यामध्ये १० फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. पण लोकेश राहुल, विराट कोहली आणि शिखर धवनच्या रुपात भारताला लागोपाठ ३ झटके लागले.

दरम्यान नवव्या ओव्हरमध्ये स्पिनर आणि 'मॅन ऑफ द मॅच' एडम जंपाच्या बॉलवर कंगारू विकेटकिपर एलेक्स केरीने स्टंपिंग करण्याचा प्रयत्न केला.

'रडीचा डाव'

या प्रसिद्ध विकेटकिपरने बॉल हातात नसतानाही हाताने बेल्स उडवल्या. आता इथपर्यंत सर्व ठिक होतं. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू असं करू शकतात हे आपल्याला माहितेय.

पण यापुढे झालं ते संताप आणणार होतं.

एकतर त्याने स्वत:च्या हाताने बेल्स उडवल्या आणि अंपायरकडे ओरडून ओरडून हिटविकेटसाठी अपील करु लागला.

आता तंत्रज्ञान इतक प्रगत असताना आपली ही 'खेळी' यशस्वी होणार नाही, एवढंही त्याला कळालं नाही. 

लेग अंपायरने रिप्ले घेण्याचा निर्णय घेतला आणि थर्ड अंपायरने जेव्हा रिप्ले घेतला तेव्हा प्लेअर आणि अंपायरच नाही तर मैदानातले प्रेक्षकही हैराण झाले.

इथे सरळ सरळ अंपायरचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. हा 'नो बॉल' म्हणून घोषित करून भारताला फ्री हिट देण्यात आली.

दिनेश कार्तिकनं १३ बॉलमध्ये ३० रनची वादळी खेळी केली. कार्तिक आणि पंत भारताला विजय मिळवून देतील अशी अपेक्षा होती पण ऋषभ पंत चुकीचा फटका मारून आऊट झाला. यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी १२ रनची आवश्यकता होती.

पण मार्कस स्टॉयनिसनं पहिले कृणाल पांड्या आणि मग दिनेश कार्तिकची महत्त्वाची विकेट घेऊन भारताचा विजयाचा घास हिरावून घेतला.