INDvsAUS:भारतीय बॅट्समन चुका सुधारतील, पुजाराला विश्वास

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतीय बॅटिंग पुन्हा एकदा गडबडली.

Updated: Dec 6, 2018, 11:35 PM IST
INDvsAUS:भारतीय बॅट्समन चुका सुधारतील, पुजाराला विश्वास

ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतीय बॅटिंग पुन्हा एकदा गडबडली. चेतेश्वर पुजाराच्या शतकामुळे पहिल्या दिवसाअखेरीस भारतानं २५०/९ अशी मजल मारली. भारताच्या बॅट्समननी चांगली बॅटिंग करायला पाहिजे होती, पण दुसऱ्या सत्रापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या बॉलरनीही चांगली बॉलिंग केली, असं पुजारा म्हणाला. धैर्य दाखवून खराब बॉलची वाट पाहण्याचा मी प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया पुजारानं दिली. आमचे बॅट्समन पुढच्या इनिंगमध्ये चुका सुधारतील असा विश्वास पुजारानं व्यक्त केला.

मी आज पूर्णपणे तयार होतो. माझ्या टेस्ट क्रिकेट आणि प्रथम श्रेणी क्रिकेटचा अनुभव माझ्या कामाला आला, असं वक्तव्य पुजारानं केलं. पुजारानं २४६ बॉलमध्ये १२३ रन करून पुजारा आऊट झाला. पुजारानं ३८० मिनीटं बॅटिंग केली. ४१ रनवर ४ विकेट गेल्यानंतर पुजारानं रोहितबरोबर ४५ रनची पार्टनरशीप केली. यानंतर पुजारानं ऋषभ पंतसोबत ४१ रन, अश्विनसोबत ६२ रन, ईशांत शर्मासोबत २१ रन आणि मोहम्मद शमीसोबत ४० रनची पार्टनरशीप केली.

पुजारानं त्याच्या खेळीमध्ये १८० बॉलवर एकही रन काढली नाही. तर ३० वेळा १ रन, २२ वेळा २ रन, ३ वेळा ३ रन, ७ फोर आणि २ सिक्स मारले. ५० च्या स्ट्राईक रेटनं पुजारानं त्याची खेळी केली.

चेतेश्वर पुजाराचं टेस्ट क्रिकेटमधलं हे १६वं शतक होतं. शतक करायच्या आधी पुजारानं टेस्ट क्रिकेटमध्ये ५ हजार रनही पूर्ण केले.

तळाच्या खेळाडूंसोबत तुम्ही बॅटिंग करता तेव्हा तुम्हाला माहिती असतं की ते किती वेळ बॅटिंग करू शकतात. तुम्हाला मध्ये मध्ये धोका पत्करून त्यांना स्ट्राईक द्यावा लागतो, असं पुजारा म्हणाला. ४१ रनवर ४ विकेट गेल्यानंतर पुजारानं रोहितबरोबर ४५ रनची पार्टनरशीप केली. यानंतर पुजारानं ऋषभ पंतसोबत ४१ रन, अश्विनसोबत ६२ रन, ईशांत शर्मासोबत २१ रन आणि मोहम्मद शमीसोबत ४० रनची पार्टनरशीप केली.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close