...आणि पावसात विराट कोहलीने सुरु केला डान्स

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट मॅचवर पावसाचं सावट आहे. पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशीही टीम इंडियाला मैदानात सराव करता आला नाही. 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 6, 2017, 07:09 PM IST
...आणि पावसात विराट कोहलीने सुरु केला डान्स  title=
File Photo

रांची : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट मॅचवर पावसाचं सावट आहे. पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशीही टीम इंडियाला मैदानात सराव करता आला नाही. 

सलग पडणाऱ्या पावसामुळे टीम इंडियाला सराव करता येत नाहीये. मात्र, यामुळे टीमच्या मनोबलावर कुठलाही परिणाम झालेला नाहीये. रांचीमध्ये कोसळत असलेल्या पावसाचा कॅप्टन विराट कोहलीने पूर्ण आनंद घेतला आहे. मैदानात पाऊस पडत असताना कॅप्टन विराट कोहलीने इतरांसोबत मजा-मस्ती करताना डान्स सुरु केला.

रांचीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात शनिवारी मॅच होणार आहे. मॅचच्या एक दिवस आधी टीम इंडिया मैदानात प्रॅक्टीससाठी उतरली मात्र, त्याच दरम्यान पाऊस सुरु झाल्याने टीम पून्हा माघारी परतली.

पाऊस पडत असल्याने कॅप्टन विराट कोहली, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहसोबत शिखर धवन हे सर्व पेवेलियनमध्ये उभे राहून पावसाचा आनंद लुटत होते. सर्व क्रिकेटर्स मजा-मस्ती करत असतानाच कॅप्टन कोहलीने अचानक डान्स करण्यास सुरुवात केली. 

गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मॅच होणार की नाही यासंदर्भात संभ्रम कायम आहे. शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे हवामान खात्याने पूढील २४ तासही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सात ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरपर्यंत पाऊस होण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.