दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंका १ बाद १९

भारताविरुद्दच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसअखेर भारताने श्रीलंकेने १ बाद १९ धावा केल्या.

Updated: Aug 13, 2017, 06:57 PM IST
दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंका १ बाद १९

कँडी : भारताविरुद्दच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसअखेर भारताने श्रीलंकेने १ बाद १९ धावा केल्या.

तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा पहिला डाव १३५ धावांवर संपुष्टात आलाय. भारताने श्रीलंकेवर फॉलोऑन लादला.

हार्दिक पांड्याच्या झुंजार खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ४८७ धावा केल्या. हार्दिकने १०८ धावा ठोकताना भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. 

या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव १३५ धावांवर संपुष्टात आला. तिसऱ्या कसोटीत संधी मिळालेला चायनामन कुलदीप यादवने ४ विकेट घेतल्या. मोहम्मद शामी आणि आर. अश्विनने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.