विराटचं वनडेत आणखी एक शतक, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराटनं आणखी एक शतक झळकावलं आहे.

Updated: Oct 24, 2018, 05:09 PM IST
विराटचं वनडेत आणखी एक शतक, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल  title=

विशाखापट्टणम : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराटनं आणखी एक शतक झळकावलं आहे. विराटचं वनडेमधलं हे ३७वं शतक आहे. विराटच्या शतकामुळे भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरु झाली आहे. याआधी पहिल्या वनडेमध्येही विराटनं शतक केलं होतं. वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमधलं विराटचं हे लागोपाठ तिसरं शतक आहे. वेस्ट इंडिजविरुद्धचं वनडेमधलं विराटचं हे ६वं शतक आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये एवढी शतकं कोणत्याच खेळाडूनं केली नव्हती.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा

विराटनं सचिनचा विक्रम मोडला

विराट कोहलीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. वनडे क्रिकेटमध्ये विराटनं १० हजार रन पूर्ण केले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये एवढ्या जलद १० हजार रन पूर्ण करणारा विराट पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. विराटनं २०५व्या इनिंगमध्ये हा टप्पा ओलांडला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराटला हा टप्पा ओलांडायला ८१ रनची गरज होती. सचिन तेंडुलकरनं हे रेकॉर्ड २५९ इनिंगमध्ये केलं होतं.

वनडेत सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकर याच्या नावावर वनडेमध्ये सर्वाधिक ४९ शतकांची नोंद आहे. वनडे क्रिकेटमध्ये १० हजार रन पूर्ण करणारा विराट १३वा खेळाडू बनला आहे.

याआधी वनडेमध्ये सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, रिकी पाँटिंग, सनथ जयसूर्या, महेला जयवर्धने, इंझमाम उल हक, जॅक कॅलिस, सौरव गांगुली, राहुल द्रविड, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान आणि एम.एस. धोनी यांनी वनडेमध्ये १० हजार रनचा टप्पा ओलांडला आहे.