भारत विरुद्ध बांग्लादेश टी-20 : रोहित शर्मानं टॉस जिंकला

बांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Updated: Mar 8, 2018, 06:57 PM IST
भारत विरुद्ध बांग्लादेश टी-20 : रोहित शर्मानं टॉस जिंकला

कोलंबो : बांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये पराभव झाल्यानंतर आता या सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल. बांग्लादेशविरुद्धच्या मागच्या पाचही टी-20मध्ये भारताचा विजय झाला आहे. हेच रेकॉर्ड कायम ठेवण्याचा मानस भारतीय टीमचा असेल.

अशी आहे भारतीय टीम

रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना, मनिष पांडे, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, वॉश्गिंटन सुंदर, विजय शंकर, जयदेव उनाडकट, युझवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा