श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारतानं टॉस जिंकला

 श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. 

Updated: Mar 12, 2018, 08:27 PM IST
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारतानं टॉस जिंकला title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. पावसामुळे ही मॅच सुरु व्हायला उशीर झाला आहे. त्यामुळे मॅच १९ ओव्हरचीच होणार आहे. या मॅचमध्ये भारतानं १ बदल केला आहे. रिषभ पंतऐवजी के.एल.राहुलला संधी देण्यात आली आहे. या टी-20 ट्रायसीरिजमध्ये श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना भारतानं गमावला तर बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला. श्रीलंका आणि बांग्लादेशमधला सामना बांग्लादेशनं जिंकला.

मॅचआधी श्रीलंकेला झटका

भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या टी-20 मॅचआधी श्रीलंकेला मोठा झटका लागला आहे. श्रीलंकेचा कॅप्टन दिनेश चंडीमल दोन मॅचसाठी निलंबित झाला आहे. वेळेमध्ये ओव्हर पूर्ण न केल्यामुळे चंडीमलवर ही कारवाई करण्यात आली आहे. बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 मॅचमध्ये श्रीलंकेनं निर्धारित वेळेमध्ये चार ओव्हर कमी केले. या कारणामुळे चंडीमलचं निलंबन करण्यात आलं आहे.

अशी आहे भारतीय टीम

रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना, के.एल. राहुल, मनिष पांडे, दिनेश कार्तिक, विजय शंकर, वॉशिंग्टन सुंदर, जयदेव उनाडकट, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल