लैंगिक शोषण प्रकरणात भारतीय खेळाडू अमेरिकेत दोषी करार

भारताचा २४ वर्षीय खेळाडू तन्वीर हुसैन एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी अमेरिकेत दोषी ठरलाय.

Updated: Aug 3, 2017, 08:53 PM IST
लैंगिक शोषण प्रकरणात भारतीय खेळाडू अमेरिकेत दोषी करार title=

नवी दिल्ली : भारताचा २४ वर्षीय खेळाडू तन्वीर हुसैन एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी अमेरिकेत दोषी ठरलाय.

तन्वीर हुसैन बर्फात खेळल्या जाणाऱ्या स्नोशू खेळामध्ये भाग घेण्यासाठी कश्मीरमधून अमेरिकेत दाखल झाला होता. 

एका १२ वर्षीय मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी तन्वीर दोषी आढळलाय. एसेक्सच्या एका काऊंटी न्यायालयानं त्याला दोषी करार दिलंय. 

वर्तमानपत्र 'द एडीरोनडैक डेली एन्टरप्रायजेस'नं दिलेल्या माहितीनुसार, सारांक लेक व्हिलेज पोलिसांनी तन्वीरला १ मार्च रोजी अटक केली होती. याच्या दोन दिवस अगोदर त्यानं डिव माऊंटन रिक्रिएशन सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय स्नोशू चॅम्पियनशीपमध्ये सहभाग नोंदवला होता. 

तन्वीरनं मात्र आपल्यावरील आरोप फेटाळलेत. तसंच भारतात परतण्यासाठी कुठल्याही प्रकारे करार करण्यास नकार दिलाय. गेल्या पाच महिन्यांपासून तन्वीर अमेरिकेतच आहे. त्याची पत्नी लिंडी एलिसनं एसेक्स काऊंटीतून त्याच्यासाठी जामीन मिळवलाय.