मोहम्मद शमीवर उठलेल्या प्रश्नावर युवराज सिंगचे हे उत्तर...

  सध्या मोहम्मद शमी यांच्या कौटुंबिक वादाने क्रिकेट विश्वात मोठे वादळ उठले आहे. त्यामुळे सर्व पत्रकार इतर क्रिकेटर्सची या संदर्भात प्रतिक्रिया घेत आहेत. हरियाणाच्या सोनीपतमध्ये एका क्रिकेट अकादमीमध्ये पोहचलेल्या युवराज सिंगला पत्रकारांनी शमी प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली. 

प्रशांत जाधव | Updated: Mar 13, 2018, 08:46 PM IST
 मोहम्मद शमीवर उठलेल्या प्रश्नावर युवराज सिंगचे हे उत्तर...

सोनीपत :  सध्या मोहम्मद शमी यांच्या कौटुंबिक वादाने क्रिकेट विश्वात मोठे वादळ उठले आहे. त्यामुळे सर्व पत्रकार इतर क्रिकेटर्सची या संदर्भात प्रतिक्रिया घेत आहेत. हरियाणाच्या सोनीपतमध्ये एका क्रिकेट अकादमीमध्ये पोहचलेल्या युवराज सिंगला पत्रकारांनी शमी प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली. 

शमी याच्यावर त्याच्या पत्नीने लावलेल्या आरोपांवर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता प्रतिक्रिया देण्यास युवराज सिंग याने नकार दिला. पत्रकारांना पुन्हा हा प्रश्न विचारल्यावर युवराज सिंग म्हणाला मी या प्रकरणी काही बोलू इच्छित नाही. युवराज म्हणाला, कोण आपल्या खासगी जीवनात काय करतो, त्यावर कोणीही प्रतिक्रिया दिली नाही पाहिजे. 

मी कोणत्याही बाहेरच्या गोष्टींवर लक्ष देत नाही. मी माझ्या क्रिकेट प्रॅक्टीसवर लक्ष केंद्रीत करतोय.  आगामी विश्व चषकासाठी आपली जागा पक्की करण्यासाठी माझे प्रयत्न असतील. मला वाटते की लवकरच मी २०११ च्या लयमध्ये पुन्हा येईल. त्यामुळे आम्ही २०१९चा विश्व चषक जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याची युवीची इच्छा आहे. 

भारतीय क्रिकेट टीमचा जलद गती गोलंदाज मोहम्मद शमी हा सध्या पत्नी हसिना जहाँ हिने गंभीर आरोप लावल्यानंतर चारही बाजूंनी तो घेरला गेला होता. भावाशी जबरदस्ती संबंध बनविण्यास सांगणे आणि इतर तरूणींशी संबंध ठेवल्याचा आरोप हसीना जहाँने लावला होता.