न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ सज्ज

या व्हिडीओच्या शेवटी कर्णधार विराट कोहली सोबत त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील होती. 

Updated: Jan 21, 2019, 11:10 AM IST
न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ सज्ज title=

वेलिंग्टन : ऑस्ट्रेलिया दौरा जिंकल्यानंतर भारतीय संघ आता न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ शनिवारी १९ तारखेला न्यूझीलंडमधील ऑकलंड येथील विमानतळावर दाखल झाला. त्यावेळी उपस्थितांकडून भारतीय संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले.

विमानतळावर आगमन होत असतानाचा व्हिडीओ इंडियन क्रिकटे टीम या फेसबुक पेजवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओत केदार जाधव, मोहम्मद शमी दिसत आहेत. तसेच या व्हिडीओच्या शेवटी कर्णधार विराट कोहली सोबत त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील होती. भारतीय संघाचा उत्साह वाढवण्यासाठी अनुष्का शर्मा नेहमीच मैदानावर दिसून येते.

असा असेल न्यूझीलंड दौरा

न्यूझीलंड दौऱ्यात ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे.  ५ एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बुधवार २३ जानेवारीला नेपिअर येथे होणार आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ : 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, युझवेंद्र चहाल, रविंद्र जडेजा, भु़वनेश्वर कुमार, खलील अहमद, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, विजय शंकर.