भारतीय महिला फुटबॉल संघाचा मलेशियावर विजय

कुआलालम्पुरमध्ये एक आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप मॅचमध्ये प्यारी शाशाच्या दोन गोलच्या मदतीने भारतीय महिला फुटबॉल टीमने मलेशियाचा 2-0 ने पराभव केला आहे.

Updated: Aug 1, 2017, 10:11 AM IST
भारतीय महिला फुटबॉल संघाचा मलेशियावर विजय title=

मुंबई : कुआलालम्पुरमध्ये एक आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप मॅचमध्ये प्यारी शाशाच्या दोन गोलच्या मदतीने भारतीय महिला फुटबॉल टीमने मलेशियाचा 2-0 ने पराभव केला आहे.

पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघाचा एकही गोल नव्हता. त्यानंतर प्यारी शाशाने एमपी सेलायंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात 79 व्या आणि 86 व्या मिनिटाला दोन गोल करत भारताला विजय मिळवून दिला.