INDvsAUS : पर्थ टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहीत-अश्विन बाहेर

खेळपट्टीवर आणखी गवत हवं होतं, कोहलीचा आत्मविश्वास दुणावला 

Updated: Dec 13, 2018, 11:21 AM IST
INDvsAUS : पर्थ टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहीत-अश्विन बाहेर title=

पर्थ : भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा कसोटी सामना उद्यापासून सुरू होत आहे. या सामन्यात भारताला दुखापतींचा फटका बसलाय. पहिल्या कसोटीआधी दुखापतग्रस्त झालेला पृथ्वी शॉ दुसऱ्या कसोटीलाही मुकणार आहे. तर आर अश्विन आणि रोहित शर्माही दुसऱ्या कसोटीला मुकणार आहेत. मात्र पर्थची वेगवाग खेळपट्टी लक्षात घेऊन कर्णधार कोहलीने संघात ४ तेज गोलंदाजांना स्थान दिलंय. त्यामुळे पत्रकार परिषदेत कोहलीने खेळपट्टीवर आणखी गवत हवं होतं असे आत्मविश्वासपूर्ण उद्गार काढले आहेत. अॅडलेडपेक्षाही जास्त गवत असलेली खेळपट्टी गॅब्बामध्ये मिळायला हवी होती... त्यामुळे आम्ही कसोटीत २० विकेट्स घेऊ शकतो असा आत्मविश्वास विराट कोहलीने पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

'ऑप्टस'वर पहिलीच टेस्ट 

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पर्थमध्ये होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाच्या अंतिम १३ खेळाडुंची यादी जाहीर करण्यात आलीय. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (बीसीसीआय) गुरुवारी सकाळी ट्विटरवर १३ खेळाडुंच्या नावाची घोषणा केली. शुक्रवारी सुरु होणारी ही मॅच पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये होणार आहे... या मैदानात अजून एकही टेस्ट मॅच खेळली गेलेली नाही हे विशेष... 

या टेस्टमध्ये पहिल्या टेस्टमध्ये खेळलेल्या रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांचा समावेश करण्यात आलेला नाही. तर उमेश यादव, रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार हे मात्र टीममध्ये पतरलेत.

अशी असेल भारतीय टीम

विराट कोहली (कॅप्टन), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह भवनेश्वर कुमार, उमेश यादव

या सीरिजमधली पहिली टेस्ट टीम इंडियानं जिंकून ७१ वर्षांतील इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातील एखाद्या टेस्ट सीरिजमधली पहिली मॅच जिंकली होती. अॅडलेडमध्ये झालेल्या या मॅचमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला ३१ रन्सना पछाडलं होतं.