IndvsPak : 'हिटमॅन' रोहित शर्माचे दोन रेकॉर्ड

कोणते आहेत हे रेकॉर्ड 

IndvsPak : 'हिटमॅन' रोहित शर्माचे दोन रेकॉर्ड  title=

मुंबई : पाकिस्तान विरूद्ध आशिय कप सामन्यात पुन्हा एकदा रोहित शर्माने शानदार खेळ दाखवला. अर्ध शतक करून 39 चेंडूत 52 धावा केल्या. यामध्ये त्याने 6 चौके आणि 3 छक्के मारले. पाकिस्तानच्या विरूद्ध पहिली विकेट घेऊन त्याने शिखर धवनसोबत 86 धावा केल्या. हाँगकाँग विरूद्ध खेळताना लवकर बाद झाल्यामुळे त्याने या सामन्यात कोणतीही चूक केली नाही. 

त्याचप्रमाणे या सामन्यात त्याने दोन मोठे रेकॉर्ड आपल्या नावे केले. यावेळी रोहित शर्मा जगातील सर्वात जास्त सरासरी करणारा फलंदाज आहे. जगातील एक असा ओपनर ज्याने जवळपाल 50 शिफ्ट खेळल्या आहेत. या सरासरीमध्ये रोहित शर्मा सर्वात पुढे आहे. 

सर्वात जास्त सरासरी करणारा फलंदाज 

54.39 रोहित शर्मा
50.10 हाशिम अमला 
48.29 सचिन तेंडुलकर 
46.68 शिखर धवन 
46.08 ब्रायन लारा 

फास्ट छक्का मारणारा तिसऱ्या नंबरवरील फलंदाज 

या सरासरीत रोहित शर्माने 6 छक्के मारले. यानंतर सर्वात फास्ट आणि जोरात छक्का लगावणारा रोहित शर्मा तिसरा नंबरवरचा खेळाडू ठरला आहे. वनडे मध्ये 100 सिक्स मारणारे फलंदाजीत रोहित शर्मा तिसऱ्या नंबरवर आहे. पहिल्या क्रमांकावर शाहिद आफ्रिदी त्याने वन डे मध्ये 26 चेंडूत 6 छक्के लगावले. तर दुसऱ्या नंबरवर ब्रँडन मॅक्कुलम असून त्याने 27 चेंडूत 6 छक्के लगावले आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने 35 चेंडूत छक्के लगावले आहेत.  

प्रति चेंडूत सर्वात छक्के लगावणारा खेळाडू 

26 शाहिद आफ्रिदी 
27 ब्रँडन मॅक्कुलम 
35 रोहित शर्मा 
40 क्रिस गेल 
45 मार्टिन गुप्टिल 
52 सनथ जयसूर्या 
59 विरेंद्र सेहवाग