आयपीएलच्या खेळाडूंवर खर्च होणार 80 कोटी

आयपीएलच्या टिम आता खेळाडूंच्या लिलावावर 80 कोटी रुपयांपर्यत खर्च करू शकतात.

Updated: Dec 7, 2017, 11:17 PM IST
आयपीएलच्या खेळाडूंवर खर्च होणार 80 कोटी

नवी दिल्ली : आयपीएलच्या टीमआता खेळाडूंच्या लिलावावर 80 कोटी रुपयांपर्यत खर्च करू शकतात.

खर्चाची मर्यादा 80 कोटी

आयपीएलच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याआधी खेळाडूंच्या लिलावावर 66 कोटी रुपयांपर्यत खर्च करण्याची मर्यादा होती. ती वाढवून आता 80 कोटी रुपयांपर्यत नेण्यात आली आहे.

आधी मतभेद नंतर सार्वमत

कोणत्याही आयपीएल टीमला आता गत वर्षीच्या जास्तीत जास्त 5 खेळाडूंना संघात ठेवता येणार आहे. उर्वरीत खेळाडूंना लिलावाद्वारे घ्यावं लागणार आहे. याच्या अंमल बजावणीबाबत आयपीएल टीममध्ये दोन गट होते. परंतु नंतर सार्वमताने निर्णय घेण्यात आला.