इंग्लंडची टेस्ट सीरिजच्या तयारीला सुरुवात, शेवटच्या वनडेसाठी दोन बदल

भारताविरुद्धच्या शेवटच्या वनडे मॅचआधीच इंग्लंडनं टेस्ट सीरिजच्या तयारीला सुरुवात केली आहे.

Updated: Jul 16, 2018, 08:11 PM IST
इंग्लंडची टेस्ट सीरिजच्या तयारीला सुरुवात, शेवटच्या वनडेसाठी दोन बदल title=

लीड्स : भारताविरुद्धच्या शेवटच्या वनडे मॅचआधीच इंग्लंडनं टेस्ट सीरिजच्या तयारीला सुरुवात केली आहे. शेवटच्या आणि निर्णायक वनडेसाठी इंग्लंडनं डेव्हिड मलानऐवजी जेम्स विन्सला टीममध्ये घेतलं आहे. वनडे सीरिज १-१नं बरोबरीमध्ये आहे. या सीरिजमधली शेवटची वनडे मंगळवारी हेडिंग्लीमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याधी इंग्लंडनं डेव्हिड मलान आणि सॅम कुरेन यांना इंग्लंड लायन्स टीममधून खेळण्यासाठी पाठवलं आहे. इंग्लंड लायन्स भारतीय ए टीम विरुद्ध चार दिवसांची मॅच खेळणार आहे.

डेव्हिड मलान याआधी पाकिस्तानविरुद्ध दोन टेस्ट मॅच खेळला होता. पण तीन इनिंगमध्ये मलानला फक्त ४६ रनच करता आल्या. अॅलेक्स हेल्सच्या खेळण्याबद्दल प्रश्न उपस्थित झाल्यामुळे मलानला टीममध्ये घेण्यात आलं होतं. शेवटच्या वनडेसाठी जेम्स विन्सला टीममध्ये घेण्यात आलं आहे. घरगुती स्पर्धेमध्ये शानदार प्रदर्शन केल्यामुळे विन्सला टीममध्ये स्थान मिळालं. हॅम्पशरचा विन्सनं समरसेटविरुद्ध १०९ आणि यॉर्कशायरविरुद्ध १७१ रनची खेळी केली होती. २०१६ सालच्या बांगलादेश दौऱ्यामध्ये विन्स शेवटची वनडे खेळला होता.

इंग्लंडची टीम 

इओन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, मोईन अली, जो रुट, जॅक बॉल, लियाम प्लंकेट, बेन स्टोक्स, आदिल रशिद, डेव्हिड विली, मार्क वूड, जेम्स विन्स