..म्हणून जसप्रीत बुमराहने फॅनला ट्विटरवर केले ब्लॉक

भारताचा कॅप्टन विराट कोहली पाठोपाठ अनेक भारतीय खेळाडू फीटनेसकडे अधिक लक्ष देत आहेत.

Updated: Nov 19, 2017, 12:54 PM IST
..म्हणून जसप्रीत बुमराहने फॅनला ट्विटरवर केले ब्लॉक  title=

मुंबई : भारताचा कॅप्टन विराट कोहली पाठोपाठ अनेक भारतीय खेळाडू फीटनेसकडे अधिक लक्ष देत आहेत.

आता 'सिक्स पॅक अ‍ॅब्स' हे केवळ बॉलिवूडचं नव्हे तर आता क्रिकेटर्समध्येही दिसायला लागलं आहे. 

बुमराहने शेअर केला फोटो 

नुकताच जसप्रीत बुमराह या भारतीय खेळाडूने सिक्स पॅक अ‍ॅब्स दाखवणारा एक शर्टलेस सेल्फी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला होता. या फोटोची सोशल मीडियामध्ये खूप चर्चा होती. 

एकीकडे तरूणींकडून कौतुकास्पद प्रतिक्रिया येत होत्या तर दुसरीकडे काही जणांनी या फोटोवर टीकाही केली. 

 

एका ट्विटर अकाऊंटवरून ' मला न्युडीटी आवडत नाही' असे कॅप्शन टाकून बुमराहच्या फोटोला शर्ट घातलेला फोटोशॉप फोटो त्यानं पोस्ट केला होता. 

बुमराहला हा प्रकार काही रूचला नाही. त्यामुळे बुमराहने त्याच्या फॅनला ट्विटरवर ब्लॉक  केले. त्यानंतर ही गोष्ट देखील बुमराहच्या चाहत्यांने पोसट करताना म्हटले . 'कदाचित बुमराहला फोटोशॉप आवडले नसावे. ' 

सध्या भारतीय संघ हा श्रीलंकेविरूद्ध टेस्ट मॅच खेळत आहे. या सामन्यांमध्ये बुमराहला आराम देण्यात आला आहे.