मुंबई इंडियन्सला धक्का, नऊ वर्षानंतर या सदस्याचा राजीनामा

२०१८चं आयपीएल सुरु व्हायला आणखी चार महिने बाकी आहेत. पण त्याआधीच मुंबई इंडियन्सना झटका बसला आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 7, 2017, 11:32 PM IST
मुंबई इंडियन्सला धक्का, नऊ वर्षानंतर या सदस्याचा राजीनामा

मुंबई : २०१८चं आयपीएल सुरु व्हायला आणखी चार महिने बाकी आहेत. पण त्याआधीच मुंबई इंडियन्सना झटका बसला आहे. मुंबई इंडियन्सचा फिल्डिंग कोच जॉन्टी रोड्सनं पदाचा राजीनामा दिला आहे. तब्बल ९ वर्ष जॉन्टी रोड्स मुंबईचा फिल्डिंग कोच होता. जॉन्टीऐवजी आता जेम्स पॅमेन्ट मुंबई इंडियन्सचा फिल्डिंग कोच असेल.

वैयक्तिक व्यावसायीक कारणांसाठी जॉन्टीनं पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबई इंडियन्सनं १० वर्षांमध्ये ३ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या. या विजयामध्ये जॉन्टी रोड्सचं मोलाचं योगदान होतं. जॉन्टी रोड्स हा नेहमीची मुंबई इंडियन्सच्या कुटुंबाचा हिस्सा राहील, अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सकडून देण्यात आली आहे. जेम्स पॅमेन्ट यांनी न्यूझीलंडच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीमलाही प्रशिक्षण दिलं आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close