लोकेश राहुलनं चौथ्या इनिंगमध्ये बनवला दुसरा सर्वात मोठा स्कोअर

 इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या शेवटच्या इनिंगमध्ये लोकेश राहुल आणि ऋषभ पंतनं शतक ठोकलं आहे.

Updated: Sep 11, 2018, 08:46 PM IST
लोकेश राहुलनं चौथ्या इनिंगमध्ये बनवला दुसरा सर्वात मोठा स्कोअर title=

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या शेवटच्या इनिंगमध्ये लोकेश राहुल आणि ऋषभ पंतनं शतक ठोकलं आहे. चहापानापर्यंत लोकेश राहुल १४३ रनवर तर ऋषभ पंत १०९ रनवर खेळत होता. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा राहुल ४६ रनवर नाबाद होता. तेव्हा टीमचा स्कोअर ५८-३ एवढा होता. पण लोकेस राहुलनं रहाणेसोबत पार्टनरशीप करून इनिंगला आकार दिला. राहुल आणि रहाणेनं ११८ रनची पार्टनरशीप केली. अजिंक्य रहाणेची विकेट गेल्यानंतर हनुमा विहारी शून्य रनवर आऊट झाला. यानंतर राहुलनं पंतबरोबरही शतकी पार्टनरशीप केली.

लोकेश राहुल दुसरा भारतीय

भारतीय ओपनर म्हणून चौथ्या इनिंगमध्ये एवढा स्कोअर करणारा लोकेश राहुल दुसरा भारतीय आहे. या यादीमध्ये सुनिल गावसकर पहिल्या क्रमांकावर आहेत. १९७९ मध्ये ओव्हलच्या मैदानावरच गावसकर यांनी इंग्लंडविरुद्ध २२१ रन केले होते. तिसऱ्या क्रमांकावर गावसकर यांचेच ११७ रन आणि चौथ्या क्रमांकावर शिखर धवनच्या ११५ रनचा समावेश आहे.