IPL 2024 : 'तुझ्याकडे पर्याय नाही, सही कर...', विराटने का केली होती केएल राहुलसोबत जबरदस्ती?

Virat Kohli force KL Rahul to sign RCB Contract : केएल राहुल आरसीबी संघासोबत कसा जोडला गेला? याचा खुलासा स्वत: राहुलने केला आहे. त्यावेळी त्याने विराटची आठवण काढली.

सौरभ तळेकर | Updated: Apr 19, 2024, 07:45 PM IST
IPL 2024 : 'तुझ्याकडे पर्याय नाही, सही कर...', विराटने का केली होती केएल राहुलसोबत जबरदस्ती? title=
Virat Kohli force KL Rahul to sign RCB Contract

KL Rahul On RCB Contract : टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) सध्या लखनऊ सुपर जाएन्ट्स (Lucknow Super Giants) संघाची जबाबदारी सांभाळत आहे. मात्र, तुम्हाला माहितीये का? केएल राहुलने आपल्या आयपीएल करियरची सुरूवात 2013 मध्ये आरसीबीकडून (RCB Contract) केली होती. त्यानंतर त्याने हैदराबाद आणि पंजाबकडून आपली झलक दाखवली अन् आता तो लखनऊ सारख्या बड्या संघाची जबाबदारी पार पाडत आहे. अशातच अश्विनच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना लखनऊचा कॅप्टन केएल राहुल याने मोठा खुलासा केला आहे. राहुल आरसीबीच्या संघासोबत कसा जोडला गेला? यावर राहुलने भाष्य केलंय. त्यावेळी त्याने विराट कोहलीचा (Virat Kohli) उल्लेख केला.

केएल राहुलने काय सांगितलं?

आयटीसी गार्डेनिया हॉटेलमध्ये विराट कोहली आणि टीमचा स्टाफ होता. त्यावेळी कोच रे जेनिंग देखील उपस्थित होते. विराट माझ्याजवळ आला अन् फक्त एवढंच म्हणाला की, तुला आरसीबीकडून खेळायचंय का? राहुल, तू आरसीबीच्या करारावर स्वाक्षरी करणार का? असा प्रश्न विराटने मला विचारला. मी त्याला म्हणालो, माझं स्वप्न आहे. तू थट्टा करतोयस का? असं राहुल सांगतो. त्यावेळी विराट म्हणाला, मी तुझी गंमत करत होतो. तुझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये. तुला करारावर सही करावीच लागेल, असं विराटने राहुलला म्हटलं होतं.

आरसीबीसोबत तुझा भन्नाट प्रवास असणार आहे. पुढील तीन महिने तू मजा करशील, असंही विराटने मला सांगितल्याचं राहुलने म्हटलं आहे. मला देखील आरसीबीकडून खेळण्यासाठी उत्सुक होतो. मी तिथूनच सुरूवात केली अन् मला शेवट देखील तिथेच करायचा होता, असंही राहुलने म्हणतो. मात्र, तुम्हाला वेगवेगळ्या संघांकडून खेळण्याची संधी मिळते, हेच आयपीएलचं वैशिष्ठय आहे, असंही केएल राहुल याने आश्विनसह बोलताना म्हटलं आहे.

दरम्यान, केएल राहुलने 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. केएल राहुलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आजपर्यंत 124 सामने खेळले आहेत आणि 45.97 च्या सरासरीने 4,367 धावा केल्या आहेत. त्याने 4 शतके आणि 34 अर्धशतके देखील झळकावली आहेत, ज्यात त्याचा सर्वोच्च आयपीएल स्कोअर नाबाद 132 धावा आहे. लखनऊ सुपर जाएन्ट्सने के एल राहुलला 17 कोटीमध्ये खरेदी केलं होतं.