'कुंबळे-शास्त्री येत जात राहतील पण....'

टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. 

Updated: Jul 19, 2017, 03:51 PM IST
'कुंबळे-शास्त्री येत जात राहतील पण....' title=

मुंबई : टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. या दौऱ्याला रवाना होत असताना विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीनं पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादांवर या दोघांनीही भाष्य केलं.

अनिल कुंबळे आणि रवी शास्त्री येत-जात राहतील, पण टीम इंडियाचं यश हेच माझं ध्येय असल्याचं भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलंय. तर प्रशिक्षक निवडीचा आणि इतर वादाचा आपल्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. त्याचप्रमाणे मैदानावरील परिस्थिती सांभाळणार आहे. मैदानाबाहेरली गोष्टी माझ्या नियंत्रणात नसल्याचं मत कॅप्टन कोहलीनं व्यक्त केलंय. प्रशिक्षक निवडीच्या वेळी माझ्या भूमिकेबद्दल मीडियामध्ये अनेक चर्चा झाल्या. पण माझ्या हातात फक्त बॅट आहे. या बॅटनं सर्वोत्तम कामगिरी द्यायची एवढचं माझ्या हातात आहे, असं कोहली म्हणाला आहे.

भरत अरुणची टीम इंडियाचा बॉलिंग प्रशिक्षक म्हणून नेमणूक झाली आहे. या निवडीवरही रवी शास्त्रीनं भाष्यं केलं आहे. माझ्यापेक्षा भरत अरुण टीम इंडियाला चांगलं ओळखतो, असं शास्त्री म्हणाला आहे. टीम इंडियाच्या श्रीलंका दौ-याला 26 जुलैपासून सुरुवात होईल. 

पाहा काय म्हणाले कोहली आणि शास्त्री