'विजयाचा सिक्सर' आयुष्यभर लक्षात राहिल - कार्तिक

श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या निडास ट्रॉफी टी 20 च्या सिरीजमध्ये बांग्लादेश विरूद्ध सामन्यात टीम इंडियाचा दिनेश कार्तिक विजयाचा नायक ठरला. 

Dakshata Thasale Updated: Mar 20, 2018, 10:57 AM IST
'विजयाचा सिक्सर' आयुष्यभर लक्षात राहिल - कार्तिक  title=

कोलंबो : श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या निडास ट्रॉफी टी 20 च्या सिरीजमध्ये बांग्लादेश विरूद्ध सामन्यात टीम इंडियाचा दिनेश कार्तिक विजयाचा नायक ठरला. 

दिनेश कार्तिकने याबाबत सांगितलं की, हा क्षण मला आयुष्यभर लक्षात राहिल. दिनेश कार्तिकने लगावलेल्या या छक्कामुळे ऋषिकेश कानिटकर आणि जोगिंदार शर्मा या खेळाडूंच्या श्रेणीत येऊन विराजमान झालं आहे. ज्यांनी टूर्नामेंट फायनलच्या तणावपूर्व स्थितीत संघाला विजय मिळवून दिला. 

दिनेश कार्तिकने या आठवणींना दिला उजाळा 

कानिकटकरने पाकिस्तानच्या विरूद्ध 1998 मध्ये ढाकामध्ये इंडिपेंडेस कपमध्ये फायनलमध्ये चौकार लगावून विजय मिळवला. तर जोगिंदर शर्माने जोहानिसबर्गमध्ये 2007 च्या टी 30 विश्व कपमध्ये फायनलमध्ये पाकिस्तानमध्ये कॅप्टन मिस्बाहउल हक याची विकेट घेऊ भारताला चॅम्पिअन बनवलं. 

दिनेश कार्तिकचं क्रिकेट करिअर 13 वर्षाहून अधिक आहे. मात्र त्याला आतापर्यंत अशी एकही संधी मिळाली नव्हती. या एका सिक्सरमुळे कार्तिकने जावेद मियांदाद यांची आठवण ताजी करून ठेवली. ज्याने शारजाहमध्ये भारतच्या विरूद्धच्या सामन्यात शेवटच्या चेंडूत सिक्सर ठोकून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. 

काय म्हणाला दिनेश कार्तिक?

निडास ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर त्याने बीसीसीआय डॉट टीव्हीशी संपर्क साधल्यास, हा खूप खास अनुभव आहे. हा अनुभव माझ्यासोब कायम राहणार आहे. त्याने सांगितले  आहे की, माझ्यासाठी गेल्या वर्षभराचा खेळातील प्रवास खास राहिलेला आहे. आणि यामध्ये सहभागी होऊन मी खूप खूष आहे. या टूर्नामेंटकरता भरपूर मेहनत केली आहे. आणि हा विजय आम्हाला आंनद देणारा आहे.