'महाराष्ट्र कुस्ती लीग'चा थरार

महाराष्ट्राच्या रांगड्या मातीचा दमदार खेळ म्हणजे कुस्ती... 

Updated: Jan 13, 2018, 09:04 AM IST
'महाराष्ट्र कुस्ती लीग'चा थरार

मुंबई : महाराष्ट्राच्या रांगड्या मातीचा दमदार खेळ म्हणजे कुस्ती... 

खेळणाऱ्याला एवढाच पाहणाऱ्यालाही वेगळीच ऊर्जा देणारा अस्सल जिगरबाज, मर्दानी मातीतला कुस्तीचा खेळ आता 'महाराष्ट्र कुस्ती लीग' या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणार आहे. 

'झी समूहा'ने कुस्तीच्या या नव्या रुपासाठी पुढाकार घेतलाय. सगळ्यांच्या लाडक्या 'झी टॉकीज'वर 'महाराष्ट्र कुस्ती लीग' या भव्य स्पर्धेचे ९ ते १८ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आलंय. 

या उपक्रमाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, एस्सेल समूहाचे मार्गदर्शक आणि राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा सर आणि झी टॉकीजचे बिझनेस हेड भावेश जानवेलकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.