शिवी देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला मनीष पांडेने दिलं उत्तर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात महेंद्रसिंग धोनीने २८ चेंडूत ५२ धावांची जबरदस्त खेळी केली.

Updated: Feb 23, 2018, 06:54 PM IST
शिवी देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला मनीष पांडेने दिलं उत्तर  title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात महेंद्रसिंग धोनीने २८ चेंडूत ५२ धावांची जबरदस्त खेळी केली.

यात ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. एरव्ही सामन्यात कूल असणारा धोनी दुसऱ्या सामन्यात मनीष पांडेवर भडकलेला दिसला.

त्याने पांडेला शिवी दिली आणि हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने पसरला. पण पांडेने धोनीच्या या वक्तव्याला आपल्या स्टाईलने उत्तर दिले आहे.

...आणि धोनी भडकला 

 भारताचा डाव सुरु असताना २०व्या षटकांत धोनी आणि मनीष पांडे फलंदाजी करत होते. या वेळी धोनी स्ट्राईकवर होता.

यानंतर धोनीने पांडेच्या दिशेने इशारा केला मात्र पांडेने त्याकडे लक्ष दिले नाही. यानंतर धोनी चांगलाच भडकला आणि मनीष पांडेला शिवी दिली. हे सर्व स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाले.

यानंतर धोनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. लोकांनी यावर अनेक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

'यालाच क्रिकेट म्हणतात'

 दरम्यान मनीष पांडे प्रेस कॉन्फरन्समध्ये या विषयावर बोलता झाला. अशा क्षणांचा सामना करणे खूप कठिण असतात.त्यावेळेस त्याच्यावर किती प्रेशर होता हे त्याने सांगितले. अशा प्रेशर मधून बाहेर पडण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागल्याचेही त्याने सांगितले.

पण हेच क्रिकेट आहे. तुम्हाला संधीची वाट पाहावी लागते. जिथे दिग्गज तुमच्या आजुबाजूला खेळत असातात तिथे चांगला खेळ व्हावा यासाठी माझे प्रयत्न सुरू असल्याचेही पांडेने सांगितले. 

५ नंबरला खेळण्याचा दबाव 

 ४ नंबरवर उतरुनही चांगला खेळ करण्याचा मी प्रयत्न केला. बॅटिंग कॉम्बिनेशनमुळे ५ नंबरला उतराव लागलं.

इथेही चांगला खेळ करण्याच्या मी प्रयत्नात आहे. याजागेवर युवराज आणि रैनासारखे बॅट्समन खेळून गेलेयत. त्यांची जागा घेणं सोपं नाहीए. पण मला अजून काही संधींची गरज आहे. 

धोनीची तारीफ 

 धोनीची तारीफ करायला यावेळी पांडे विसरला नाही. आपल्या खेळाचे पूर्ण क्रेडिट त्याने धोनीला दिले. लोवर लेवलला धोनी सर्वात बेस्ट खेळाडू असल्याचे तो म्हणाला.