भारताची चांगली सुरुवात, मेरी कोम, देवेंद्रो क्वार्टरफायनलमध्ये

पाच वेळा विश्वविजेती ठरलेली एम सी मेरीकोमने मंगोलियामधील उलानबटर कप बॉक्सिंग स्पर्धेची क्वार्टरफायनल गाठलीये. भारताच्या पहिल्याच दिवशी चार धमाकेदार विजयासह चांगली सुरवात केली. 

Updated: Jun 22, 2017, 06:43 PM IST
भारताची चांगली सुरुवात, मेरी कोम, देवेंद्रो क्वार्टरफायनलमध्ये title=

नवी दिल्ली : पाच वेळा विश्वविजेती ठरलेली एम सी मेरीकोमने मंगोलियामधील उलानबटर कप बॉक्सिंग स्पर्धेची क्वार्टरफायनल गाठलीये. भारताच्या पहिल्याच दिवशी चार धमाकेदार विजयासह चांगली सुरवात केली. 

तब्बल एका वर्षानंतर पुनरागमन करणाऱ्या मेरी कोमचा पुढील सामना अन्ना अडेमा आणि कोरियाच्या चोल मी बँग यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. 
आशियाई रौप्य पदक विजेता एल देवेंद्रो सिंह(५२ किलो) वजनी गटात प्रतिस्पर्ध्याला हरवलत क्वार्टरफायनलमधील स्थान निश्चित केले. 

मोहम्मग हसमुद्दीन(५६ किलो) आणि रोहित टोकस(६४ किलो) यांनी पुरुष ड्रॉमध्ये विजय मिळवलाय. हसमुद्दीनने किर्गीस्तानच्या अलमानबेट एलीबेकोव्हला हरवले. आता त्याची लढत चीनच्या मा जिन मिंगशी होणार आहे. 

रोहित टोकसने रशियाच्या दोर्जा दाखाएव्हला हरवले आणि क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला.