आयपीएलमध्ये कमबॅक करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जचा कमजोर दुवा

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी घालण्यात आलेली २ वर्षांची बंदी उठवल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जचं आयपीएलमध्ये कमबॅक झालं आहे. 

Updated: Jan 28, 2018, 11:08 PM IST
आयपीएलमध्ये कमबॅक करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जचा कमजोर दुवा  title=

बंगळुरू : स्पॉट फिक्सिंगप्रकरणी घालण्यात आलेली २ वर्षांची बंदी उठवल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जचं आयपीएलमध्ये कमबॅक झालं आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावामध्ये चेन्नईनं २४ खेळाडूंची निवड केली. आत्तापर्यंत झालेल्या आयपीएलमध्ये चेन्नईच्या टीममध्ये युवा खेळाडू होते. पण यंदा मात्र चेन्नईच्या टीममधले महत्त्वाचे खेळाडू ३० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यामुळे युवा खेळाडूंसाठी असलेल्या आयपीएलमध्ये चेन्नईचे बुजुर्ग खेळाडू कमजोर दुवा ठरणार का प्रश्न उपस्थित होत आहे.

अशी आहे चेन्नईची टीम

महेंद्रसिंग धोनी- ३६ वर्ष

सुरेश रैना- ३१ वर्ष

फॅप डुप्लेसिस- ३३ वर्ष

हरभजन सिंग- ३७ वर्ष

ड्वॅन ब्राव्हो- ३४ वर्ष

शेन वॉटसन- ३६ वर्ष

केदार जाधव- ३२ वर्ष

अंबाती रायडू- ३२ वर्ष

इमरान ताहीर- ३८ वर्ष

करन शर्मा- ३० वर्ष

मुरली विजय- ३३ वर्ष

सॅम बिलिंग्स- २६ वर्ष

शार्दुल ठाकूर- २६ वर्ष

जगदीसन नारायण- २२ वर्ष

मिचेल सॅन्टनर- २५ वर्ष

दीपक चाहर- २५ वर्ष