अशोक वाटिकेचा फोटो शेअर केल्याने मोहम्मद शमी पुन्हा ट्रोल

श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया सध्या रिलॅक्स मूडमध्ये आहे. 

Updated: Aug 11, 2017, 05:59 PM IST
अशोक वाटिकेचा फोटो शेअर केल्याने मोहम्मद शमी पुन्हा ट्रोल title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया सध्या रिलॅक्स मूडमध्ये आहे. १२ ऑगस्टपासून टीम इंडियाचा तिसरा सामना सुरु होतोय. याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी आपल्या कुटुंबासह मजामस्ती केली. 

यातच टीम इंडियामधील काही खेळाडूंनी सोशल मीडियावर अशोक वाटिकेतील फोटोही शेअर केलेत. मोहम्मद शमीनेही अशोक वाटिकेतील फोटो शेअर केलेत. मात्र त्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर जोरदार टीका सुरु केलीये.

शमीने हे फोटो शेअर करताना म्हटलंय, टीम इंडिया अशोक वाटिकेत आहे. रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर जेथे ठेवले होते ती ही जागा आहे. 

फोटोमध्ये शमीसोबत त्याची पत्नी, उमेश यादवची पत्नीही दिसत आहे. याशिवाय ऋषभ पंत, वृद्धिमन साहा, लोकेश राहुल, कुलदीप यादवही दिसत आहेत.