पत्नीच्या आरोपानंतर बीसीसीआयचा मोहम्मद शमीला जोरदार धक्का

भारतीय क्रिकेट संघांचा फास्टर बॉलर मोहम्मद शमी सध्या मोठ्या वादात अडकला आहे. त्याच्यावर मारहाणी आणि दुसऱ्या मुलींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप खुद्द त्याची पत्नी हसीनने केला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 7, 2018, 07:44 PM IST
पत्नीच्या आरोपानंतर बीसीसीआयचा मोहम्मद शमीला जोरदार धक्का title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघांचा फास्टर बॉलर मोहम्मद शमी सध्या मोठ्या वादात अडकला आहे. त्याच्यावर मारहाणी आणि दुसऱ्या मुलींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप खुद्द त्याची पत्नी हसीनने केला आहे.

बीसीसीआयने देखील आता शमीला मोठा धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या कमिटीने बुधवारी खेळाडूंना बीसीसीआयच्या करारानुसार मिळणाऱ्या पगाराबाबत घोषणा केली आहे. पण या यादीमध्ये शमीचं नावच नाही. बीसीसीआयने त्याचं नाव या ग्रेडमधून वगळलं आहे. 

टीम इंडियाच्या पगारामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. पण कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये मोहम्मद शमीला जागा नाही देण्यात आली आहे. पत्नीने केलेल्या आरोपानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. पण बोर्डाकडून याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.