आयपीएल २०१९: मोहम्मद कैफ दिल्लीचा सहाय्यक प्रशिक्षक

भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफला आयपीएलमध्ये नवी जबाबदारी मिळाली आहे.

Updated: Nov 9, 2018, 05:39 PM IST
आयपीएल २०१९: मोहम्मद कैफ दिल्लीचा सहाय्यक प्रशिक्षक

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफला आयपीएलमध्ये नवी जबाबदारी मिळाली आहे. मोहम्मद कैफची दिल्लीचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. कैफ २०१७ सालच्या आयपीएलमध्ये गुजरात टीमचा सहाय्यक प्रशिक्षक होता. कैफ दिल्लीच्या टीममध्ये रिकी पाँटिंग आणि जेम्स होप्सला सहाय्य करेल. दिल्लीच्या टीमशी जोडलं गेल्यामुळे मला खूप चांगलं वाटतंय. दिल्लीची टीम उत्कृष्ट आहे आणि आम्ही नक्कीच चांगलं प्रदर्शन करू असा विश्वास कैफनं व्यक्त केला आहे.

शिखर धवनचीही घरवापसी

भारताचा ओपनर शिखर धवन आयपीएलमध्ये पुन्हा एकदा दिल्लीच्या टीमकडून खेळताना दिसणार आहे. हैदराबादच्या टीमनं शिखर धवनला दिल्लीच्या टीमला ट्रान्सफर केलं आहे.

शिखर धवननं आयपीएलची सुरुवात दिल्लीच्या टीमकडूनच केली होती. २००८ साली धवन दिल्लीच्या टीममध्ये होता.

सध्या तो हैदराबादच्या टीमकडून खेळत होता. शिखर धवनला टीममध्ये घ्यायच्या बदल्यात दिल्लीनं विजय शंकर, अभिषेक शर्मा आणि शाहबाज नदीमला सोडून दिलं आहे.

हैदराबादनं लिलावामध्ये शिखर धवनला ५.२ कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. शिखर धवन त्याच्या या किंमतीवरून खुश नव्हता. तसंच हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मुडी यांच्यासोबतही धवनचे वाद झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

दिल्लीनं विजय शंकर, शाहबाज नदीम आणि अभिषेक शर्मा यांना एकूण ६.९५ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. आता या तिघांना टीममध्ये घेण्यासाठी हैदराबादला धवनची रक्कम (५.२ कोटी) घटवून बाकीची रक्कम दिल्लीला द्यावी लागणार आहे.

२००८ साली दिल्लीकडून खेळल्यानंतर धवन मुंबईसाठी खेळला. यानंतर त्याला हैदराबादच्या टीमनं विकत घेतलं. धवननं हैदराबादकडून खेळताना सर्वाधिक रन केले आहेत. धवननं ९१ इनिंगमध्ये ३५.०३ च्या सरासरीनं २,७६८ रन केले आहेत. मागच्या वर्षी धवननं ३५.५० च्या सरासरीनं ४९७ रन केले होते.

१५ नोव्हेंबरपर्यंत आयपीएल फ्रॅन्चायजीना दुसऱ्या फ्रॅन्चायजींसोबत खेळाडू अदलाबदली करता येणार आहेत. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close