मोहम्मद शमीने केलेत पत्नीवर हे आरोप

भारताचा क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद कमी होण्याऐवजी आणखीनच बिघडत चाललेत. हसीन जहांने शमीवर मारहाण, बलात्कार,हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसा आणि मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केलेत. तसेच त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रारही दाखल केलीये.

Updated: Mar 17, 2018, 12:20 PM IST
मोहम्मद शमीने केलेत पत्नीवर हे आरोप title=

मुंबई : भारताचा क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद कमी होण्याऐवजी आणखीनच बिघडत चाललेत. हसीन जहांने शमीवर मारहाण, बलात्कार,हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसा आणि मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केलेत. तसेच त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रारही दाखल केलीये.

हसीन जहांने केलेल्या सर्व आरोपांचे मोहम्मद शमीने खंडन केलेय. हे घरातले वाद असून घरातच सोडवले गेले पाहिजेत अशी शमीची भूमिका आहे. मात्र आता हसीन जहाविरोधातही शमीने आरोप करण्यास सुरुवात केलीये.

एका न्यूज चॅनेलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये मोहम्मद शमीने हसीन जहांवर गंभीर आरोप केलेत. आतापर्यंत शमी इतर मुलींशी चॅट करत असल्याचा आरोप हसीन जहांने केले होते. आता हसीन जहांवर शमीने चॅटिंगचा आरोप केलाय. हसीन जहां आजही तिच्या पहिल्या नवऱ्याशी चॅटिंग करत असल्याचा आरोप शमीने केलाय. सूत्रांच्या मते हसीन आपला पहिला पतीशी सतत संपर्कात असते. लग्नानंतरही ती त्याच्याशी संपर्कात होती. 

शमी म्हणाला, लवकरच या प्रकरणी तो हसीन जहांविरोधात पुरावे सादर करणार आहे. हसीनने जितके आरोप लावलेत त्यांची उत्तरे कोर्ट आणि तपास अधिकाऱ्यांसमोर पुराव्यासहित ठेवणार असल्याचेही शमीने सांगितलेय.