VIDEO: वडिलांचा हात धरुन पुण्याच्या प्रवासाला निघाली CUTE झिवा

कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शानदार ७९ धावाच्या खेळीनंतरही चेन्नईला पंजाबविरुद्धच्या सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले.

Updated: Apr 18, 2018, 11:23 AM IST
VIDEO: वडिलांचा हात धरुन पुण्याच्या प्रवासाला निघाली CUTE झिवा title=

मुंबई : कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शानदार ७९ धावाच्या खेळीनंतरही चेन्नईला पंजाबविरुद्धच्या सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले. या सामन्यात चेन्नईचा चार धावांनी पराभव झाला. पंजाबने चेन्नईला हंगामातील पहिला पराभव चाखायला लावला. चेन्नईने या हंगामातील सलग दोन सामने जिंकले होते मात्र तिसऱ्या सामन्यात ही विजयी परंपरा पंजाबने रोखली.

या सामन्यात चेन्नईला जरी विजय मिळवता आला नसला तरी धोनीची शानदार खेळी आणि मुलगी झिवाने चेन्नईच्या चाहत्यांची मने जिंकली. सामन्यादरम्या झिवाच्या क्यूट अदांनी साऱ्यांचीच मने जिंकली. पंजाबविरुद्धच्या सामन्यात धोनी जेव्हा चौकार, षटकार खेचत होता तेव्हा झिवाही स्टेडियममधून हा खेळ पाहत होती. यादरम्यानचा तिचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. याता झिवा म्हणते मला बाबांना मिठी मारायची आहे. झिवाच्या या व्हिडीओनंतर आणखी काही व्हिडीओही व्हायरल झालेत.  या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये झिवा धोनीचा हात हातात घेऊन पुण्याच्या प्रवासासाठी निघालीये.

 

Regrann from @ms.mahi7781 - When they were on the way to pune - #regrann

A post shared by Mahi7781 (@bleed_mahism) on

याआधी झिवाचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला गेला होता. या व्हिडीओ झिवाला आपल्या बाबाला मिठी मारायची आहे. धोनी मैदानात असताना ती धोनीला बोलावते. 

 

When Ziva wanted to give a hug to papa during the match

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

टी२० स्पर्धेच्या या प्रवासात धोनीसह त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा एकत्र आहेत. प्रवासादरम्यान झिवा नेहमीच धोनीच्या मांडीवर बसलेली असते. झिवाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन धोनी आणि झिवाचे अनेक फोटो नेहमी शेअर केले जातात.