परिवारासोबत 'व्हेकेशन'वर असणार्‍या महेंद्रसिंग धोनीने शेअर केला हा खास व्हिडिओ

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या त्याच्या परिवारासोबत काही निवांत क्षण जगताना दिसत आहेत.

Updated: Mar 13, 2018, 08:01 PM IST
परिवारासोबत 'व्हेकेशन'वर असणार्‍या महेंद्रसिंग धोनीने शेअर केला हा  खास व्हिडिओ

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या त्याच्या परिवारासोबत काही निवांत क्षण जगताना दिसत आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यानंतर धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी झीवासोबत भटकंती करत आहे.  

इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ 

महेद्रसिंग धोनी दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावरून आल्यानंतर त्याला निडास ट्रॉफी मॅचेसदरम्यान आराम देण्यात आला. या वेळेचा सदुपयोग करत धोनी कुटुंबासोबत काही शांत क्षण जगताना दिसत आहे. 

 

 

Fun time with the family

A post shared by @ mahi7781 on

आयपीएलसाठी सज्ज होतोय  

महेंद्रसिंग धोनी पुन्हा CCK  म्हणजेच चैन्नई सुपरकिंग या संघातून खेळताना दिसणार आहे. मागील दोन वर्ष या संघावर बॅन टाकण्यात आला होता. 

झीवासोबतचे व्हिडिओ सुपरहीट 

 

धोनीप्रमाणेच त्याची मुलगी सोशलमीडियावर खूपच हीट आहे. काही दिवसांपूर्वी फूटबॉलच्या ग्राऊंडवर झीवा धोनीला पाणी पाजत असल्याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close