मुंबईच्या बॉलिंगपुढे हैदराबादची बॅटिंग गडबडली

मुंबईच्या बॉलिंगपुढे हैदराबादची बॅटिंग गडबडली आहे.

Updated: Apr 24, 2018, 09:55 PM IST
मुंबईच्या बॉलिंगपुढे हैदराबादची बॅटिंग गडबडली  title=

मुंबई : मुंबईच्या बॉलिंगपुढे हैदराबादची बॅटिंग गडबडली आहे. हैदराबादच्या टीमला २० ओव्हरमध्ये फक्त ११८ रनपर्यंत मजल मारता आली आहे. त्यामुळे मुंबईला विजयासाठी ११९ रनची आवश्यकता आहे. या मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय मुंबईच्या बॉलरनी योग्य ठरवला आणि सुरुवातीपासूनच हैदराबादला झटके दिले. मुंबईकडून मिचेल मॅकलेनघन, हार्दिक पांड्या आणि मयंक मार्कंडेला प्रत्येकी २ विकेट मिळाल्या. तर जसप्रीत बुमराह आणि मुस्तफिजूर रहमानला प्रत्येकी १ विकेट घेण्यात यश आलं. हैदराबादच्या टीमला संपूर्ण २० ओव्हरही खेळता आल्या नाहीत. १८.४ ओव्हरमध्येच हैदराबादची टीम ऑल आऊट झाली. हैदराबादकडून केन विलियमसन आणि युसुफ पठाणनं सर्वाधिक २९ रन केल्या.

आत्तापर्यंत खेळलेल्या ५ मॅचमध्ये मुंबईला फक्त एकाच मॅचमध्ये विजय मिळवता आला आहे. त्यामुळे ही मॅच जिंकून विजयाच्या मार्गावर पुन्हा परतण्याचं आवाहन मुंबईपुढे असणार आहे. मुंबईनं गमावलेल्या चारही मॅचचा निकाल शेवटच्या ओव्हरमध्ये लागला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम सातव्या क्रमांकावर आहे तर हैदराबाद पाचव्या क्रमांकावर आहे. हैदराबादनं ५ पैकी ३ मॅच जिंकल्या आहेत.