मॅच खेळायला नाही आला जखमी विजय, बोर्डाने केले टीमच्या बाहेर

भारतीय टेस्ट संघाचा सलामी फलंदाज मुरली विजयला तमिळनाडूच्या वन डे संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. आता तो विजय हजारे स्पर्धेच्या इतर सामन्यात खेळू शकणार नाही. विजयला टीम बाहेर करण्यामागे कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 9, 2018, 07:42 PM IST
मॅच खेळायला नाही आला जखमी विजय, बोर्डाने केले टीमच्या बाहेर

चेन्नई : भारतीय टेस्ट संघाचा सलामी फलंदाज मुरली विजयला तमिळनाडूच्या वन डे संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. आता तो विजय हजारे स्पर्धेच्या इतर सामन्यात खेळू शकणार नाही. विजयला टीम बाहेर करण्यामागे कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे. 

गुरूवारी तामिळनाडूला मुंबई विरूद्ध सामना खेळायचा होता. पण विजय या सामन्याला योग्य वेळेत पोहचू शकला नाही. मुरली विजयवर शिस्तभंग केल्याने कारवाई करत बोर्डाने त्याला संपूर्ण स्पर्धेतून बाहेर केले. 

दुसरीकडे असे म्हटले जाते की खांद्याला दुखापत झाल्याने विजय सामना खेळू शकला नाही. तामिळनाडू क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुरूवारी सकाळी साडे सातच्या सुमारास मुरली विजय याने कोच ऋषिकेश कानेटकर याला आपल्याला दुखापत झाल्याचे सांगितले होते. सामना ८ वाजता सुरू होतो. तामिळनाडूचा संघ यापूर्वीच दुखापतग्रस्त अभिनव मुकुंदशिवाय खेळत होता. त्यात विजय नाही आल्याने आणखी अडचणी वाढल्या. अखेर गंगा श्रीधर आणि कौशिक गांधी यांनी सलामी फलंदाजी केली. 

बोर्डने शिस्तभंगामुळे त्याला संपूर्ण स्पर्धेतून बाहेर केले आहे. विजयशी जवळीक असलेल्या व्यक्तींनुसार बोर्डाच्या या वागणुकीमुळे सर्व हैराण आहेत. लवकरच गैरसमज दूर करण्यात प्रयत्न केला जाईल. 

३३ वर्षाचा विजय याने स्पर्धेत गुजरात विरुद्ध ११ आणि गोव्या विरूद्ध ५१ धावांची खेळी केली होती. प्रदोष रंजन पॉल आता मुरलीच्या जागी खेळणार आहे. Espncricinfo नुसार विजयच्या वागणुकीमुळे बोर्ड यापूर्वीच हैराण आहे. त्यामुळे त्याला रणजी संघात स्थान देण्यात आले नाही. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close