टी-२० मधून निवृत्त होणारा नेहरा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू

टीम इंडियाचा दिग्गज फास्ट बॉलर आशीष नेहरा दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे.

Updated: Nov 1, 2017, 04:54 PM IST
टी-२० मधून निवृत्त होणारा नेहरा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू title=

मुंबई : टीम इंडियाचा दिग्गज फास्ट बॉलर आशीष नेहरा दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे.

38 वर्ष 186 दिवस वय असलेला नेहरा आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यामधून निवृत्त होणारा दुसरा सर्वात वयस्कर क्रिकेटर आहे. या लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर राहुल द्रविड आहे. द्रविड 38 वर्ष 232 दिवसात टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झाला होता.

आपल्या 18 वर्षांच्या करिअरमध्ये नेहराने 17 कसोटीत 44 बळी घेतले. 120 एकदिवसीय सामन्यांत 157 बळी आणि 26 टी -20 मध्ये 34 विकेट्स घेतले. 1999 पासून टेस्ट आणि 2001 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय टीममध्ये नेहराने पदार्पण केले.