पहिल्यांदा नेपाळने केला भारतीय क्रिकेट टीमचा पराभव

भारतीय क्रिकेट संघाला  मोठं आव्हान देत भाराताचा 19 धावांनी पराभव झाला आहे. आशिया कपमध्ये भारताला पराभवाची धूळ चारली आहे. 

Updated: Nov 13, 2017, 12:27 PM IST
पहिल्यांदा नेपाळने केला भारतीय क्रिकेट टीमचा पराभव title=

नवी दिल्ली : नेपाळ क्रिकेट संघाने मोठे आव्हान देत भारतीय क्रिकेट संघाचा 19 धावांनी पराभव केला आहे. आशिया कपच्या अंडर 19 मध्ये नेपाळने भारतला पराभवाची धूळ चारली आहे. 

भारताला नेपाळने 186 धावांचं लक्ष्य दिलं होतं. भारतीय संघ 48.1 षटकात 166 धावातच ऑल आऊट झाला. नेपाळने प्रथमच टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला आहे.

फलंदाजी करतांना नेपाळचे फलंदाज भारतीय गोलंदाजांपुढे असहाय्य दिसले. पम 50 षटकांमध्ये आठ विकेट गमवत त्यांनी 185 रन केले. भारताच्या सलामीच्या जोडीशिवाय इतर कोणीही जास्त वेळ क्रिजवर टिकू शकला नाही. दिपेंद्र सिंहच्या गोलंदाजीपुढे संपूर्ण संघ 166 धावांपर्यंत मजल मारु शकला.

नेपाळकडून दिपेंद्र राणाने 101 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 88 धावा केल्या तर जिंतेद्र सिंग ठाकुरीने 95 चेंडूत 36 धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाज जास्त रन करु शकले नाहीत. अभिषेक शर्मा आणि आदित्य ठाकरे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. भारताचा कर्णधार हिमांशु राणा (46) आणि मनोज कलारा (35) यांनी पहिल्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. भारताने 25.1 षटकात 100 धावां करत 4 गडी गमावले. परंतु 48.1 षटकात संपूर्ण संघ 166 रनवर तंबूत परतला.