'हा' विख्यात क्रिकेटर कॅन्सरच्या विळख्यात

वेलिंगटन - न्युझिलंडचा दिग्गज खेळाडू रिचर्ड हॅडली सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. लवकरच कॅन्सरवर मात करून रिचर्ड बाहेर येतील अशा आशा त्याच्या पत्नी डियानी यांनी व्यक्त केल्या आहेत. 

Updated: Jun 13, 2018, 12:25 PM IST
'हा' विख्यात क्रिकेटर कॅन्सरच्या विळख्यात

वेलिंगटन - न्युझिलंडचा दिग्गज खेळाडू रिचर्ड हॅडली सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. लवकरच कॅन्सरवर मात करून रिचर्ड बाहेर येतील अशा आशा त्याच्या पत्नी डियानी यांनी व्यक्त केल्या आहेत. 

कोलोनोस्कोपी 

डियानीने दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षांपासून रिचर्ड यांची कोलोनोस्कोपी करण्यात आली आहे. मागील माहिन्यात त्यांना कॅन्सरने ग्रासले असल्याचं उघड झालं आहे. ट्युमर काढण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेनंतर रिचर्ड यांच्या प्रकृतीमध्ये सुधार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

केमोथेरपी  होणार  

66 वर्षीय हेडलींवर लवकरच कीमोथेरपी करण्यात येणार आहे. हेडली हे जगातील वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 400 हून अधिक विकेट घेणारे हेडली हे पहिले खेळाडू आहेत. 1990 साली त्यांनी क्रिकेटमधून संन्सास घेतला. हेडली यांनी 86 टेस्टमध्ये 22.29 या सरासरीने 431 विकेट्स घेतल्या आहेत.