बीसीसीआयचा नवा गुगली, प्रशिक्षक निवडीबाबत संभ्रम

टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या नियुक्तीमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. 

Updated: Jul 11, 2017, 06:18 PM IST
बीसीसीआयचा नवा गुगली, प्रशिक्षक निवडीबाबत संभ्रम title=

मुंबई : टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या नियुक्तीमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. रवी शास्त्रीची टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. पण अजूनपर्यंत प्रशिक्षकाची निवड झाली नसल्याचं बीसीसीआयनं सांगितलं आहे.

सल्लागार समितीमध्ये अजून चर्चा सुरु आहे. त्यामुळे प्रशिक्षकपदी कोणाची वर्णी लागणार याची घोषणा नंतर होईल, असं बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरींनी सांगितलं आहे.

टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड आज संध्याकाळपर्यंत करा असे आदेश सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेल्या बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी बीसीसीआयच्या सल्लागार समितीला दिले होते. या सल्लागार समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांचा समावेश होते.

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सल्लागार समितीनं पाच जणांच्या मुलाखती घेतल्या यात रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग, लालचंद राजपूत, रिचर्ड पायबस आणि टॉम मुडी यांच्या समावश होता. सहावा उमेदवार फील सिमन्स अनुपस्थित राहिला.