पार्थिव पटेल, केएल राहुल यांना अंतिम ११ मध्ये स्थान

टीम इंडियाची बॅटींग फळी अधिक मजबूत करण्याची गरज आहे. पार्थिवने आतापर्यंत २३ टेस्ट मॅचमध्ये ८७८ रन्स केले आहेत.

Updated: Jan 13, 2018, 08:14 AM IST
पार्थिव पटेल, केएल राहुल यांना अंतिम ११ मध्ये स्थान

नवी दिल्ली : गुजरातचा विकेटकिपर बॅट्समन पार्थिव पटेल आणि केएल राहूल यांची अंतिम ११ मध्ये वर्णी लागणार आहे. साहाच्या तुलनेत पटेल चांगला बॅट्समन मानला जातो. 

टीम इंडियाची बॅटींग फळी अधिक मजबूत करण्याची गरज आहे. पार्थिवने आतापर्यंत २३ टेस्ट मॅचमध्ये ८७८ रन्स केले आहेत.

तसेच फर्स्ट क्लास क्रिकेटमधीलही त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. त्याने १० हजाराहून अधिक रन्स बनवत २६ शतक ठोकले आहेत. त्यामूळे टीम प्रबंधक याकडे दुर्लक्ष करु शकत नाही. 

राहुल ठरतोय सरस 

शिखर धवन हा डावखुरा फलंदाज मुंबई, दिल्ली किंवा कोलंबोमध्ये चांगले प्रदर्शन करेल पण ब्रिस्बेन, हैडिंग्ले या केपटाउनमध्ये नाही असे टीम प्रबंधकांना वाटते.

तर दुसरीकडे के.एल.राहुलने आतापर्यंत २१ टेस्ट मॅचमध्ये ४४.६२ च्या सरासरीने १४२८ रन्स बनविले. यामध्ये ४ शतक आणि १० अर्धशतक आहेत.