स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पाकच्या या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी

पीसीबीच्या भ्रष्टाचार विरोधी समितीने पाकिस्तानचा टेस्ट खेळाडू शारजील खान याच्या गेल्या फेब्रुवारीमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी पाच वर्षांची बंदी घातली आहे.

Updated: Aug 31, 2017, 11:44 AM IST
 स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पाकच्या या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी title=

कराची : पीसीबीच्या भ्रष्टाचार विरोधी समितीने पाकिस्तानचा टेस्ट खेळाडू शारजील खान याच्या गेल्या फेब्रुवारीमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी पाच वर्षांची बंदी घातली आहे.

दोन टप्प्यात त्याच्यावर ही बंदी असणार आहे. त्या अडीच वर्षांसाठी त्याला निलंबनाची शिक्षा दिली जाणार आहे. 

१० फेब्रुवारीपासून ही बंदी त्याच्यावर लागू करण्यात आली आहे. तेव्हा त्याला निलंबित करण्यात आले होते आणि पाकिस्तानच्या खालिद लतीफसोबत त्याला स्पॉट फिक्सिंगच्या आरोपात दुबईहून परत पाठवण्यात आले होते. ही शिक्षा त्याला लाहोर उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असगर हैदर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुनावली होती. त्यानुसार आता शारजील दोन वर्षांनी पुन्हा त्याचे करिअर सुरू करू शकतो.

शारजीलचा वकिल एजाजने मीडियाला सांगितले की, ‘आम्ही या निर्णयाचे संतुष्ट आहोत आणि मी म्हणालो त्याप्रमाणे शारजीलने स्पोट फिक्सिंग केल्याचे पुरावे पीसीबीला मिळालेले नाहीत’. शारजीत एक टेस्ट, २५ वन डे आणि २५ टी-२० खेळला आहे.