प्रियंका पनवार डोप टेस्टमध्ये फेल, ८ वर्षाची बंदी

आशियाई खेळ -2014 मध्ये महिला रिलेमध्ये सुवर्णपदक विजेता धावपटू प्रियंका पनवार ही डोप टेस्टमध्ये फेल झाल्याने तिच्यावर ८ वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.

Updated: Sep 12, 2017, 12:01 PM IST
प्रियंका पनवार डोप टेस्टमध्ये फेल, ८ वर्षाची बंदी title=

नवी दिल्ली : आशियाई खेळ -2014 मध्ये महिला रिलेमध्ये सुवर्णपदक विजेता धावपटू प्रियंका पनवार ही डोप टेस्टमध्ये फेल झाल्याने तिच्यावर ८ वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.

प्रियंकाला हैदराबाद येथील इंटर-स्टेट एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये देखील दोषी पकडण्यात आलं होतं. ही चॅम्पियनशिप गेल्या वर्षी 28 जून ते 2 जुलै दरम्यान खेळली गेली होती. तेव्हापासून तिच्यावर बंदी होती.

प्रियंकाला आगामी रिओ आँलिम्पिकसाठी 400 मीटर रिलेमध्ये निवडण्यात आलं होतं. परंतु नंतर तिला टीममधून बाहेर केलं गेलं. तिच्या जागी आता अश्विनी अकुंजी हिला संघात समाविष्ट केलं गेलं आहे.

नाडाच्या नियमानुसार जर खेळाडू दोन वेळा डोपिंगमध्ये पकडला गेला तर, त्याच्यावर आठ वर्षे ते आजीवन बंदी लागू शकते. तसेच त्या खेळाडूकडून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदक देखील परत घेतले जातात.

प्रियंका याआधी 2011 मध्ये देखील डोप टेस्टमध्ये देखील फेल झाली होती. दोन वर्षांच्या बंदीनंतर तिला 2013 मध्ये परत राष्ट्रीय शिबीरात देखील सहभागी केलं गेलं होतं आणि इंचॉन येथील आशियाई खेळांमध्ये देखील समाविष्ट केलं गेलं होतं.