धोनीपासून हिरावला आश्विन, सेहवागची मोठी खेळी

२ कोटी मूळ किंमत असलेल्या आश्विनला प्रिती झिंटाच्या किंग्ज्स इलेव्हन पंजाबने ७ कोटी ६० लाखाला विकत घेतले. 

Updated: Jan 27, 2018, 12:25 PM IST
धोनीपासून हिरावला आश्विन, सेहवागची मोठी खेळी  title=

बंगळूर : आयपीएलमध्ये खेळाडूंच्या लिलावाला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा आर. आश्विन आता पंजाबच्या संघातून खेळणार आहे.२ कोटी मूळ किंमत असलेल्या आश्विनला प्रिती झिंटाच्या किंग्ज्स इलेव्हन पंजाबने ७ कोटी ६० लाखाला विकत घेतले. चेन्नईने याला घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण त्यांची किंमत अपूरी पडली.

आश्विनच्या बोलीबद्दल बरीच चर्चा होती. कारण कॅप्टन एम.एस.धोनीने आश्विनला पसंती दर्शविली होती.

काय म्हणाला होता कुंबळे...?

दरम्यान चेन्नई सुपर किंग्स या वर्षी रविचंद्रन अश्विनला खरेदी करु शकणार नसल्याचे कुंबळेने याआधीच सांगितले होते.

 "चेन्नईची टीम अश्विनला खरेदी करण्याचा प्रयत्न करेल, पण ते खरेदी करण्यास यशस्वी होणार नाहीत. अश्विन टीमसाठी लीडर म्हणून भूमिका निभावेल आणि काही टीम्सना अशा खेळाडूंची खूप गरज आहे.'' असे त्याने म्हटले होते. 

चेन्नईला पूर्वीच महेंद्र सिंह धोनी, सुरैश रैना आणि रविंद्र जडेजा या तीन खेळाडूंना परत पाठवले आहे. अशात लिलावादरम्यान विदेशी खेळाडूंवर आरटीएमचा प्रयोग करू शकेल. कुंबळेने सांगितले की, अश्विन आणि जडेजा ही जोडी यावर्षीही एकत्र राहावी, यासाठी चेन्नई प्रयत्न करेल. मात्र यादरम्यान असे होणे कठीण वाटत आहे.

कुंबळेने सांगितले की, चेन्नईच्या टीमने धोनी, रैना आणि जडेजा यांच्यावर खूप पैसे खर्च केले आहेत. आता ते एका स्पिनरवर ४-५ कोटीहून अधिक पैसे खर्च करणार नाही. अश्विनची किंमत खूप जास्त असेल. अशावेळी चेन्नईला त्याला खरेदी करणे कठीण होणार आहे. त्याचप्रमाणे झाल्याचे पाहायला मिळाले.

त्यावर धोनीचे काय म्हणणे ?

महेंद्र सिंग धोनीने सांगितले की, चेन्नई सुपर किंग्स स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विनला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल असे धोनीने सांगितले होते.

त्याचबरोबर चेन्नई टीमने धोनी, रैना, जडेजाला परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंचा लिलाव २७-२८ जानेवारीला बंगळूर येथे सुरू होईल. अश्विन २००९ पासून चेन्नई टीमशी जोडलेला आहे. त्याचबरोबर स्थानिक खेळाडूंना टीममध्ये घेण्यास भर दिला जाईल, असे धोनीने सांगितले.

फॅन्स आमची ताकद 

आयपीएल नियमांनुसार, चेन्नई सुपर किंग्स अश्विनसाठी राईट टू मॅच (आरटीएम) कार्डचा देखील वापर होईल. २७-२८ जानेवारीला होणाऱ्या लिलावात खेळाडूंची अंतिम किंमत ठरेल आणि ती महत्त्वपूर्ण असेल.

चेन्नई सुपर किंग्ससाठी अश्विनी पहिले प्राधान्य असेल. गेल्या आठ वर्षापासून सोबत असलेल्या खेळाडूंना नेहमी सोबत ठेवणे हेच यशाचे गमक आहे. त्यामुळे त्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर फॅन्स आमची ताकद असल्याचेही धोनीने सांगितले.