एका मॅचमध्ये २१ सिक्सर ठोकणारा हा क्रिकेटपटू टेस्ट टीममध्ये दाखल

 २०१७ मध्ये त्याला पहिल्यांदाच भारतीय टी-२० मध्ये जागा मिळाली 

Updated: Jul 19, 2018, 10:29 AM IST
एका मॅचमध्ये २१ सिक्सर ठोकणारा हा क्रिकेटपटू टेस्ट टीममध्ये दाखल title=

मुंबई : इंग्लंडविरुद्ध पाच टेस्ट मचच्या सीरिजच्या सुरुवातीच्या तीन मॅचसाठी बुधवारी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. टीम इंडियामध्ये एका अशा खेळाडूचा समावेश करण्यात आलाय ज्यानं एका मॅचमध्ये तब्बल २१ सिक्सर ठोकण्याचा पराक्रम करून दाखवलाय... हा खेळाडू म्हणजे दिल्ली रणजी टीममधून खेळणारा ऋषभ पंत... 

२०१६ मध्ये टीम झारखंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या एका रणजी मॅचमध्ये तब्बल २१ सिक्सर ठोकले होते. ५ ते ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये खेळल्या गेलेल्या झारखंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या रणजी मॅचमध्ये ऋषभनं दोन्ही वेळेस शानदार शतक ठोकले होते. पहिल्या संधीत त्यानं केवळ १०६ बॉल्समध्ये ११७ रन्स केले... यामध्ये ८ सिक्सर तर ९ फोरचा समावेश होता. दुसऱ्या संधीत ऋषभनं केवळ ६७ बॉल्सचा सामना करताना १३५ रन्स केले. यामध्ये १३ सिक्सर आणि ८ फोरचा समावेश होता. 

ऋषभ पंत मूळचा गंगोलीहाट केपालीचा रहिवासी आहे. सध्या तो रुडकीच्या ढंडेरामध्ये राहतो. ऋषभनं आपल्या करिअरला सुरुवात रुडकीतूनच केलीय. ऋषभ अंडर-१९ वर्ल्डकप दरम्यानही भाव खाऊन गेला. त्यानंतर दिल्ली डेअरडेविल्सच्या टीममध्ये त्याला संधी मिळाली... तेव्हा २०१६ मध्ये त्यानं आपल्या रणजी करिअरला प्रारंभ केला. २०१७ मध्ये त्याला पहिल्यांदाच भारतीय टी-२० मध्ये जागा मिळाली. 

ऋषभच्या नावावर केवळ ४८ बॉल्समध्ये शतक ठोकण्याचा रेकॉर्डही जमा आहे. महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून विकेटकीपर - बॅटसमन ऋषभकडे पाहिलं जातं. आयपीएल २०१८ मध्येही ऋषभनं सगळ्यांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं. 

यापूर्वी, ऋषभची इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० टीममध्ये निवड होणार अशी प्रेक्षकांना अपेक्षा होती. परंतु, ही संधी हुकली... पण, आता मात्र टेस्ट टीममध्ये जागा मिळाल्यानंतर ऋषभला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आणखी एक संधी मिळालीय.