ऋषभ पंत म्हणतो, 'ही आहे माझ्या आनंदाचं कारण'

पाहा कोण आहे ऋषभ पंतच्या आयुष्यात आलेली ही तरुणी?

Updated: Jan 17, 2019, 11:51 AM IST
ऋषभ पंत म्हणतो, 'ही आहे माझ्या आनंदाचं कारण' title=

मुंबई : ऋषभ पंतच्या आयुष्यात एक नवी तरुणी आली आहे. २१ वर्षाचा भारताचा विकेटकीपर ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियामध्ये शानदार कामगिरी करत अनेकांची वाहवाह मिळवली. सध्या तो वनडे टीममध्ये भारतीय संघाचा भाग नाही आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून भारतात आल्यानतंर त्याने त्याच्या 'स्पेशल फ्रेंड'चा फोटो शेअर केला आहे. ऋषभ पंतने बुधवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये तो आपल्या खास मैत्रिणीसोबत दिसत आहे. पण पंतने या तरुणीची ओळख गुप्त ठेवली आहे. 

या फोटोमध्ये दिसत असलेली तरुणी ही ईशा नेगी आहे. ईशा ही दिल्लीमध्ये इंटीरियर डेकोर डिजाइनर आहे. ऋषभ पंत आणि ईशा नेगीने एकत्र इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. ऋषभ पंतने फोटो शेअर करत म्हटलं आहे की, 'मी तुला आनंदीत पाहू इच्छितो. कारण तूच ते कारण आहे ज्याच्यामुळे मी आनंदीत आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

My man, my soulmate, my best friend, the love of my life. @rishabpant

A post shared by Įsha Negi (@ishanegi_) on

दुसरीकडे ईशा नेगीने तिच्या अकाऊंटवरुन हा फोटो शेअर करत म्हटलं की, 'माझा अभिन्न मित्र, माझा सर्वात चांगला मित्र, माझा आयुष्यातील प्रेम.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Never settling for less.

A post shared by Įsha Negi (@ishanegi_) on

ऋषभ पंतने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ५८.३३ च्या रनरेटने ३५० रन केले. तो या सिरीजमधला यशस्वी खेळाडू ठरला. सिडनी टेस्टमध्ये त्याने नाबाद १५९ रनची नाबाद खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर शतक ठोकणारा तो पहिला भारतीय विकेटकीपर ठरला आहे. ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध एकूण २० कॅच घेतले. यासोबतच एका टेस्ट सीरीजमध्ये सर्वाधिक कॅच घेणारा तो पहिला भारतीय विकेटकीपर ठरला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Throwback to my black hair

A post shared by Įsha Negi (@ishanegi_) on