लग्नानंतर विराट कोहलीचे झाले 'डिमोशन' ! आता झाला Vice Captain

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली काल इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले.

Updated: Dec 12, 2017, 07:56 PM IST
लग्नानंतर विराट कोहलीचे झाले 'डिमोशन' ! आता झाला Vice Captain title=

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली काल इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले.

चाहते आणि मीडियापासून दूर केवळ मोजक्या लोकांच्या उपास्थितीमध्ये दोघे विवाहबंधनात अडकले. 

सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव  

विराट आणि अनुष्काचे लग्न सिक्रेट ठेवण्यात आले होते. त्यामुळे रात्री 8.30 च्या सुमारास ट्विटरवरून अधिकृत घोषणा झाल्यानंतर अनेक कलाकार आणि खेळाडूंनी  'विरूष्का'वर शुभेच्छांचा वर्षाव केला.  

रितेश देखमुखच्या खास शुभेच्छा 

अनेक सेलिब्रिटींनी विरूष्काला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. क्रिकेटचा चाहता आणि कलाकार  असणार्‍या रितेशने या दोन्ही गोष्टींचा मेळ घालत या जोडीला खास शुभेच्छा दिल्या. 

 

 

विराट आता तू घरातला 'वाईस प्रेसिडंट' झाला आहे. घरातली प्रेसिडंट अनुष्का शर्माला शुभेच्छा अशा आशयाचं खास संदेश त्याने या जोडीला दिला आहे. 

क्रिकेट संघाचा कॅप्टन घरात होणार व्हाईस कॅप्टन 

विराट कोहलीचे खेळातील सातत्य वाखाण्याजोगे आहे. दिवसागणिक क्रिकेटमधील अनेक रेकॉर्ड विराटने मोडीत काढले आहेत. त्यापाठोपाठ विराट नवे रेकॉर्डही बनवत आहे. 

क्रिकेटच्या मैदानात 'हीट' असला तरीही घरात आता अनुष्का राज्य करण्याची शक्यता आहे. 

 

दिल्लीत रिसेप्शन 

अनुष्का आणि विराट हे दोघेही अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये इटलीमध्ये विवाहबद्ध झाले. 21  डिसेंबर रोजी दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्लीमध्ये होणार आहे. या सोहळ्यात सेलिब्रिटी आणि क्रिकेटर हजर राहणार आहेत.